शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ऊस घालतो, पैसे कसे देणार सांगा..!

By admin | Updated: October 1, 2015 00:43 IST

वसंतदादा कारखाना सभा : सभासदांचा अध्यक्षांना सवाल, एफआरपीनुसार दर देण्याचे आश्वासन

सांगली : वसंतदादा साखर कारखान्यावर सभासदांचे प्रेम असल्यामुळेच ते ऊस घालत आहेत. मात्र त्यांची बिले वेळेवर मिळत नाहीत. याबाबत संचालकही दाद देत नसतील, तर आम्ही दाद कुणाकडे मागायची, असा संतप्त सवाल सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांना बुधवारी केला. यंदाही सभासद ऊस घालण्यास तयार आहेत, पण तुम्ही पैसे कसे देणार आणि त्याची तरतूद कशी केली आहे, ते सांगा, असा जाबही सभासदांनी यावेळी विचारला. येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत ऊसउत्पादक शेतकरी थकित बिलावरून आक्रमक झाले होते. गळीत हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आलेल्या उसाची बिले तात्काळ दिली जातात. परंतु, शेवटच्या टप्प्यात आलेल्या शेतकऱ्यांना पैसेच मिळत नाहीत. थकित बिलाबाबत सभासदांनी संचालकांकडे विचारले, तर ते दाद देत नाहीत, असा आरोप मीनाक्षी पाटील, प्रभाकर पाटील, अनिल पाटील आदी सभासदांनी केला. गुंडा माळी, अनंत झांबरे, अनिल शिंदे म्हणाले की, सभासद तुम्हाला ऊस घालण्यास तयार आहेत. मात्र या शेतकऱ्यांना तुम्ही बिले कशी देणार, याचा खुलासा करा.त्यावर विशाल पाटील म्हणाले की, यंदाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालविणार आहोत. इथेनॉल प्रकल्पाची क्षमता वाढविणार असल्यामुळे पैसे उपलब्ध होणार आहेत. बँकेकडून आर्थिक तरतूद केली असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देण्यात येईल. मिलिंद खाडिलकर, सर्जेराव पाटील यांनीही कारखाना प्रशासनाच्या उणिवांबद्दल संचालक मंडळाला जाब विचारला.यावेळी उपाध्यक्ष डी. के. पाटील, बाळगोंडा पाटील, कार्यकारी संचालक के. बी. घुटे-पाटील, संचालक आदिनाथ मगदूम, निवास पाटील, सचिन डांगे, संदेश आडमुठे, सुनील आवटी, दिलीप पवार, राजेश एडके, कामगार संघटनेचे नेते प्रदीप शिंदे, श्रीकांत देसाई, प्रकाश पाटील उपस्थित होते.कारखाना खासगी संस्थेला द्या : बुटालेवसंतदादा कारखाना आर्थिक अडचणीत असेल, तर तो चांगल्या संस्थेला चालवायला देण्याचा ठराव सभासद चंद्रशेखर बुटाले यांनी मांडला. त्यांनी गेल्यावर्षीही असाच ठराव मांडला होता. तुमच्याकडे पैसे आहेत, ते घाला आणि कारखाना पूर्ण क्षमतेने चालवा, तसेच संचालक आणि प्रशासकीय खर्च कमी करून कारखाना तोट्यातून बाहेर काढा, अशी मागणी बुटाले यांनी केली. यावेळी कारखाना खासगी संस्थेला चालविण्यास देण्यामध्ये तांत्रिक अडचणी असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले.इथेनॉल प्रकल्पाची क्षमता वाढविणारइथेनॉलला प्रतिलिटर ४८ रूपये दर मिळत आहे. शासनाची तशी हमी मिळाली आहे. वसंतदादा कारखान्याने इथेनॉल निर्मितीची क्षमता २५ हजार लिटरवरून ७५ हजार लिटर केली आहे. इथेनॉलची निर्मिती क्षमता वाढविल्यामुळे कारखान्यास चांगले उत्पन्न मिळेल. तोट्यातून बाहेर पडण्याबरोबरच दर चांगला मिळाल्यास यावर्षी ऊसउत्पादकांना चांगला दर देऊ, असेही विशाल पाटील म्हणाले. ‘वसंतदादा’ला टार्गेट करण्याचा प्रयत्नजिल्ह्यातील अन्य सर्व कारखान्यांनी उसाला प्रतिटन १९०० रुपये दर देण्याचे जाहीर केले होते. परंतु, या धोरणाला आव्हान देत आम्ही २१०० रूपये देण्याचे जाहीर करून, हंगाम सुरू केला. आमची हीच भूमिका अनेक साखर कारखान्यांना खुपत असल्यामुळे, ते आम्हाला प्रत्येक ठिकाणी ‘टार्गेट’ करण्याचे प्रयत्न करीत आहेत. वेळेवर कर्ज मिळण्यातही अशीच अडचण निर्माण झाली होती. तरीही शेतकऱ्यांच्या बळावरच आम्ही प्रस्थापितांच्या खेळीला चोख उत्तर देत आहोत, असा टोला विशाल पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला.