शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात आर. आर. आबा-संजयकाका गटाचे सूर जुळले!

By admin | Updated: April 30, 2015 00:23 IST

जिल्हा बँक निवडणूक : १७९ मतदार; एकतर्फी लढतीची शक्यता; उमेदवारांकडून वैयक्तिक भेटीगाठीवर जोर

तासगाव : तासगाव तालुक्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील गटाने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सूर जुळवले आहेत. शेतकरी सहकारी पॅनेलच्या माध्यमातून तालुक्यातील चार उमेदवार, तर रयत सहकारी पॅनेलमधून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तालुक्यात १७९ मतदार आहेत. सर्वच उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठीवर जोर देत प्रचाराला सुरुवात केली आहे.खासदार संजय पाटील राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर आबा आणि काका गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोराचा हल्लाबोल केला होता. दोन्ही गटांतील संघर्ष उफाळून आला होता. मात्र राजकारणातील बदललेल्या समीकरणांमुळे पुन्हा एकदा आबा आणि काका गटाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित सूर जुळवले आहेत. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेलमधून राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहेत. आर. आर. पाटील यांच्या पश्चातदेखील तालुक्याला बँकेत चांगली संधी मिळाली आहे. आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांना कृषी, पणन, प्रक्रिया गटातून, मांजर्डेच्या कमलताई पाटील यांना महिला राखीवमधून, मणेराजुरीच्या सतीश पवार यांना सोसायटी गटातून संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून स्वत: खासदार संजय पाटील पतसंस्था, बँका गटातून निवडणूक लढवत आहेत. आमदार पतंगराव कदम यांच्या रयत सहकार परिवर्तन पॅनेलमधून सोसायटी गटातून शिरगावचे प्रताप पाटील रिंगणात आहेत. आबा आणि काका गटाचे सूर जुळल्याने याच पॅनेलचे पारडे जड राहणार आहे. तरीही प्रताप पाटील यांची उमेदवारी आणि उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांची नाराजी यामुळे काही उलथापालथ होणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे. सर्वच उमेदवारांनी गाफील न राहता, मतदारांना प्रत्यक्ष भेटून प्रचार करण्यावर भर दिला असून, त्यासाठी कार्यकर्तेही जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे.तालुक्यातील मतदार...सोसायटी गट - ७५कृषी, पणन, प्रक्रिया गट - ११पतसंस्था, बँका गट - ४४इतर संस्था गट - २८एकूण - १७९