शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सांगली, संख व आष्टा तालुक्यांच्या आशा उंचावल्या

By संतोष भिसे | Updated: March 7, 2023 18:29 IST

प्रबळ लोकभावना या एकमेव कारणाने या तालुक्यांची मागणी

सांगली : राज्यातील नव्या तालुक्यांच्या निर्मितीसाठी शासनाने अभ्यास समिती नेमली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील संख, सांगली व आष्टा तालुक्यांच्या आशा उंचावल्या आहेत. पण नव्या तालुक्यांसाठी लागू केलेले निकष पाहता यातील फक्त संख तालुक्यालाच न्याय मिळण्याची शक्यता आहे.या तीनही तालुक्यांची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. लोकांची प्रशासकीय गैरसोय टाळण्यासाठी तेथे तूर्त अपर तहसील कार्यालये सुरु करुन शासनाने मध्यम मार्ग काढला होता. नव्या तालुक्यांचा निर्णय मात्र प्रत्यक्षात आला नाही. आता शासनाने नवे निकष जाहीर केल्याने आशा उंचावल्या आहेत. लोकसंख्या, महसुल आणि महसुली क्षेत्र या निकषांवर त्यांची निर्मिती केली जाणार आहे. यासंदर्भात आदेश गेल्या आठवड्यात काढण्यात आला. प्रस्तावित नव्या तालुक्यांच्या अभ्यासासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ती सहा महिन्यांत अहवाल सादर करेल. जिल्ह्यात तासगावमधून पलूस व खानापुरातून कडेगाव तालुक्याची निर्मिती झाली. त्यानंतर जत, सांगली व संख तालुक्यांची मागणी जोरात पुढे आली. त्यावर आजतागायत निर्णय झालेला नाही. अभ्यास समिती नव्या तालुक्यांचा विस्तारित अहवाल सादर करेल. यामध्ये क्षेत्रफळ, लोकसंख्या, मिळणारा महसुल, नव्या तालुक्याच्या निर्मितीसाठीचा संभाव्य खर्च, मनुष्यबळ, खातेदार संख्या, मुख्यालयाचे भौगोलिक, नैसर्गिक ठिकाण, या तालुक्यात समाविष्ट होण्यासाठी जनमत, तंत्रज्ञानाच्या अपेक्षित सुविधा आदींचा आढावा अहवालात घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. नव्या तालुक्याचा वार्षिक खर्च, त्यांची प्रशासकीय गरज आदी मुद्यांचाही विचार केला जाणार आहे.`संख`चा दावा प्रबळशासनाच्या निकषांमध्ये संख हा एकमेव तालुका बसतो. जत तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. शिवाय जिल्हा मुख्यालयापासून लांब अंतर आहे. तालुक्याची लोकसंख्याही मोठी आहे. त्यामुळे तालुका प्रत्यक्षात येऊ शकतो. भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, प्रशासकीय निकड व जनमानस या परीक्षेत संख उत्तीर्ण होण्याची चिन्हे आहेत. सांगली व आष्टा तालुके हे सर्व निकष पार करु शकत नाहीत. प्रबळ लोकभावना या एकमेव कारणाने या तालुक्यांची मागणी सुरु आहे. सांगलीत अपर तहसील कार्यालय सुरु झाल्यानंतर नव्या सांगली तालुक्याची मागणी व पाठपुरावाही थंडावला आहे. समितीपुढे नव्या तालुक्यांची गरज सप्रमाण व ताकदीने मांडली, तरच ते प्रत्यक्षात येऊ शकतील.

टॅग्स :Sangliसांगली