शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

हॉकी स्पर्धेत देवगिरी, इस्लामपूरची विजयी सलामी-अकरा संघ सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 9:53 PM

सांगली : सांगलीत राष्ट्रीय क्रीडापटू मारूती हरी पाटील निमंत्रितांच्या खुल्या हॉकी स्पर्धांना शुक्रवारपासून प्रारंभ झाला. विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या ...

ठळक मुद्देसांगलीमध्ये स्पर्धेला सुरुवात; खेळाडूंची मोठ्याप्रमाणात गर्दी

सांगली : सांगलीत राष्ट्रीय क्रीडापटू मारूती हरी पाटील निमंत्रितांच्या खुल्या हॉकी स्पर्धांना शुक्रवारपासून प्रारंभ झाला. विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा सुरू आहेत.पहिला सामना देवगिरी फायटर्स (कोल्हापूर) विरूध्द जयहिंद मंडळ (सांगली) यांच्यात झाला. अनुभवी देवगिरी संघाने ९-१ अशा मोठ्या फरकाने जयहिंद संघाचा पराभव केला. सामनावीर किताब ‘जयहिंद’च्या ओंकार बाबर याला प्रदान करण्यात आला.

दुसरा सामना निशिकांत पाटील स्पोर्टस् क्लब (इस्लामपूर) विरूध्द पोलीस बॉईज (कोल्हापूर) यांच्यात झाला. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाली. त्यामुळे टायब्रेकरवर हा सामना झाला. या लढतीत चपळ खेळाडूंचा भरणा असलेल्या निशिकांत पाटील स्पोर्टस् क्लबने ४-२ अशा फरकाने बाजी मारली. स्पर्धेचे उद्घाटन अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश सावर्डेकर यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे होते. सावर्डेकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. जयहिंद मंडळाचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी स्वागत केले. संजय देव यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले. पंच म्हणून कपिल मोरे व दत्ता पाटील यांनी काम पाहिले.

यावेळी राजू चौगुले, मधुकर पाटील, सिकंदर अमिन, सुभाष कागवडेकर, सत्यप्पा कांबळे, अशोक नरदेकर, अशोक लोंढे आदी उपस्थित होते. अंतिम सामना १३ जानेवारी रोजी सायंकाळी होणार असून, त्याचवेळी पारितोषिक वितरण होणार आहे. जयहिंद व्यायाम मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.सांगलीत सुरु असलेल्या हॉकी स्पर्धेत शनिवारी देवगिरी स्पोर्टस क्लब (कोल्हापूर) विरुध्द जयहिंद मंडळ (सांगली) यांच्यातील चुरशीचा क्षण.

टॅग्स :HockeyहॉकीSangliसांगली