शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
4
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
5
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
6
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
7
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
8
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
9
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
10
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
11
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
12
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
13
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
14
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
15
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
16
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
17
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
18
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
19
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
20
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...

सांगलीत काळया खणीचा इतिहासाचा फलक झळकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 11:25 IST

Muncipal Corporation Water Sangli- सुशोभिकरण करत असताना काळया खणीचा इतिहासाचा फलक सांगलीतील आपटा पोलीस चौकी ते पुष्पराज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या दोनशे वर्ष जुन्या असलेल्या काळी खणीवर महापालिकेने लावला आहे. या फलकामुळे नागरिकांचे याकडे लक्ष वेधले जात आहे.

ठळक मुद्देसांगलीत काळया खणीचा इतिहासाचा फलक झळकलामहापालिकेचा खणीच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार

सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली ः सुशोभिकरण करत असताना काळया खणीचा इतिहासाचा फलक सांगलीतील आपटा पोलीस चौकी ते पुष्पराज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या दोनशे वर्ष जुन्या असलेल्या काळी खणीवर महापालिकेने लावला आहे. या फलकामुळे नागरिकांचे याकडे लक्ष वेधले जात आहे.आयुक्त नितीन कापडणीस यांनी या खणीच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. या फलकावर असा मजकूर लिहिला आहे, काळी खण ही दोनशे वर्षांपूर्वीचा पाण्याचा जुना स्त्रोत्र आहे. इसवी सन १७९९ च्या सुमाराला सांगली आणि मिरज संस्थांच्या दोन वाटण्या झाल्या. त्यावेळी सांगली हे थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्याकडे आले. त्यांनी हे शहर संस्थानिक राजधानी करण्याचे निश्चित करून ते सुनियोजित पद्धतीने वसवण्याचे ठरवले.

राजधानीसाठी आवश्यक सर्व प्रशासकीय इमारती, नागरिकासाठी घरे, गणेश दुर्ग, किल्ला नदीकाठावरील गणेश मंदिर ,यासाठी मोठ्या प्रमाणात दगडाचे आवश्यकता होती आणि हा दगडाचा पुरवठा सांगली गावाजवळच मिळेल का ? याचा शोध चिंतामणराव यांनी घेतला.

या वेळी सांगलीच्या पूर्व बाजूला असलेल्या सध्या काळी खण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागांमधील जमिनीच्या भूगर्भातील कठीण असा काळा दगड त्यांना आढळून आला. त्यामुळे नवीन राजधानीसाठी लागणाऱ्या बांधकामासाठी दगडाची गरज गावाजवळच पूर्ण झाल्याने त्यांनी याठिकाणी खण तयार केली. त्यातून मोठ्या प्रमाणात काळा दगड बाहेर काढण्यात आले. त्या दगडातून सांगली शहराच्या तत्कालीन अनेक इमारती घरे, उभी राहिली.मोठ्या संख्येने खाणकाम केल्याने या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला. त्यात पाणी साठल्याने याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. पुढे राजधानीसाठी लागणाऱ्या सर्व इमारतीची गरज पूर्ण झाल्यावर ही खण तशीच पडून राहिली. त्यामध्ये पावसाचे पाणी साठून राहिले, तसेच भुगर्भातूनही पाण्याचे झरे मिळत गेले. त्यामुळे या जागेला तळ्याचे स्वरूप आले. काळ्या दगडाची खण म्हणून ती काळी खण या नावाने ओळखली जाऊ लागली. आता सुशोभीकरणात याबाबतचा इतिहास सांगणारा फलक महानगरपालिकेने काळा खणीत लावला आहे. याकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.

गणेश मंदिर, गणेश दुर्गच्या तटबंदीसाठी याच खणीतून आणला दगड 

विशेष म्हणजे गणेश दुर्ग या मोठ्या भुईकोट किल्ल्याच्या दगडी तटबंदीसाठी त्यांनी याच काळया खणीच्या दगडाचा वापर केला. सांगलीतील गणेश मंदिरासाठी काही दगड जोतिबा डोंगरावरून मागवण्यात आले होते मात्र अन्य कामासाठी लागणारा दगड याच खणीतून आणला होता.

पद्मभूषण शहा यांनी काढलेले चित्र फलकावर पद्मभूषण डॉक्टर विजयकुमार शहा यांनी १९५८ मध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना काळया खणीचे काढलेले चित्र या फलकावर लावले गेले आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाwater scarcityपाणी टंचाईSangliसांगली