शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेला हॅलो, सांगलीला टाटा

By admin | Updated: September 14, 2014 00:12 IST

इच्छुकांची भाऊगर्दी : धावत्या दौऱ्यात गडकरींकडून चर्चेला फाटा

सांगली/मिरज : केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जिल्हा दौऱ्यानंतर ‘कही खुशी कही गम’चे वातावरण होते. मिरजेला पंधरा मिनिटांची धावती भेट देताना त्यांनी सांगलीला दूरूनच टाटा केला. मिरजेत येऊनही कार्यकर्त्यांशी, इच्छुकांशी त्यांचा संवाद होऊ शकला नाही, तर सांगलीत इच्छुक व पदाधिकाऱ्यांनी तयारी करूनही त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे इच्छुकांच्या चेहऱ्यावर अपेक्षाभंगाचे भाव स्पष्टपणे दिसत होते. केंद्रीय परिवहन आणि रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मिरजेतील खासगी फार्महाऊसवर धावत्या भेटीत कार्यकर्त्यांची भेट घेतली. भाजपच्या उमेदवारीच्या मागणीसाठी गडकरींची भेट घेण्यासाठी सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक प्रतीक्षेत होते. मात्र केवळ पृथ्वीराज देशमुख यांना तुम्ही काळजी करू नका, काम होईल, असे आश्वासन देत घाईघाईने गडकरी निघून गेले. कवठेमहांकाळ येथील अजितराव घोरपडे आणि शिवाजी (पप्पू) डोंगरे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटोपून गडकरी व खा. संजय पाटील दुपारी मिरजेत भोजनासाठी फार्महाऊसवर आले होते. खा. राजू शेट्टी, आ. गिरीश बापट, सदाभाऊ खोत, आ. चंद्रकांत पाटील, आ. सुधीर मुनगंटीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, ओंकार शुक्ल यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची गर्दी होती. सांगलीचे गौतम पवार, पलूस, कडेगावचे पृथ्वीराज देशमुख, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, कोल्हापूर दक्षिणचे चंद्रकांत जाधव, कऱ्हाडचे विक्रम पावसकर आदी इच्छुक उमेदवार नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी प्रतीक्षेत होते. मात्र गडकरी यांनी पाचच मिनिटात भोजन आटोपून कोणाशीही चर्चा न करता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण केले. जाता-जाता पृथ्वीराज देशमुख यांना तुमचे काम होईल, काळजी करू नका, असे आश्वासन दिले. गडकरी यांना निवेदन देण्यासाठी ठेकेदार व व्यापारी ताटकळत होते. मात्र ते कोणासही न भेटता निघून गेले. (प्रतिनिधी)