पोलीस कुटुंबासाठी आरोग्यविषयक उपक्रम महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST2021-02-20T05:20:03+5:302021-02-20T05:20:03+5:30

सांगली : पोलीस दलात कर्तव्यावर असलेले महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी आरोग्य शिबिरे ...

Health activities are important for the police family | पोलीस कुटुंबासाठी आरोग्यविषयक उपक्रम महत्त्वाचे

पोलीस कुटुंबासाठी आरोग्यविषयक उपक्रम महत्त्वाचे

सांगली : पोलीस दलात कर्तव्यावर असलेले महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी आरोग्य शिबिरे आवश्यक आहेत. पोलीस कुटुंबीयांच्याही आरोग्यासाठी तपासणी शिबिरासारखे उपक्रम राबविणे महत्त्वाचे असून, त्यासाठी असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रियांका दीक्षित-गेडाम यांनी केले.

जिल्हा पोलीस दलातर्फे महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. हेमलता दातार यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेडाम म्हणाल्या, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणवत असतात. त्यावर वेळीच उपचार घेतल्यास आरोग्य चांगले राहणार असल्याने यापुढे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमात डॉ. दातार यांनी दैनंदिन आरोग्य व आहाराविषयी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह महिला अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Health activities are important for the police family