शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

हवालदारास लाच घेताना पकडले

By admin | Updated: August 27, 2015 23:07 IST

इस्लामपुरात कारवाई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा

इस्लामपूर : इस्लामपूर बसस्थानक परिसरातून मोटारसायकल चोरून नेत असल्याच्या संशयावरून पकडलेल्या व्यक्तीस सोडण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच त्यातील दोन हजार रुपये लाच घेताना एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजता ही कारवाई झाली.लक्ष्मण अण्णा पवार (वय ५३, सध्या नेमणूक इस्लामपूर पोलीस ठाणे, मूळ रा. विद्यानगर गल्ली क्र. ३ वारणाली-सांगली) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, लहू अंकुश राजाराम नांगरे (४५, रा. भाटवडे, ता. वाळवा) यांचे डोंगरवाडी येथील मेहुणे कामानिमित्त स्वत:ची मोटारसायकल घेऊन इस्लामपूरला आले होते. बसस्थानक परिसरात त्यांनी त्यांची मोटारसायकल लावली. तेथेच शेजारी आणखी एक मोटारसायकल लागली होती. काही वेळाने नांगरे यांचे मेहुणे आपल्या मोटारसायकलऐवजी शेजारच्या मोटारसायकलवर बसले होते. त्यामुळे ते मोटारसायकल चोरुन नेत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी सायंकाळी त्यांना ताब्यात घेतले.या घटनेची माहिती मिळताच नांगरे हे पोलीस ठाण्यात आले. या घटनेचा तपास करणारे हवालदार लक्ष्मण पवार यांना भेटले. त्यावेळी पवार यांनी नांगरे यांच्या मेहुण्याला सोडण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावर नांगरे यांनी गुरुवारी सकाळी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात रितसर तक्रार दिली. या तक्रारीची लाचलुचपत कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये पवार याने तीन हजारांची लाच मागून चर्चेअंती दोन हजार रुपयांची लाच तातडीने आणून देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार हवालदार पवार याच्याविरुध्द सापळा लावण्यात आला. नांगरे यांच्या मेहुण्यावर कलम १०९ खाली प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्याला तहसीलदारांसमोर हजर करण्यासाठी घेऊन जाताना दुपारी सव्वाचारच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच दोन हजार रुपयांची लाच घेताना हवालदार पवार ‘लाचलुचपत’च्या सापळ्यात अलगदपणे विसावला.पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एच. ए. जाधव, कर्मचारी प्रकाश पवार, सुनील राऊत, सुनील कदम, दीपक धुमाळे, चंद्रकांत गायकवाड, सचिन कुंभार, बाळासाहेब पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला. (वार्ताहर)‘लाचलुचपत’ची २४ वी कामगिरी..!सांगलीच्या लाचलुचपत विभागाची आठ महिन्यांतील ही सुफरफास्ट अशी २४ वी कारवाई ठरली. सकाळी तक्रार दाखल झाल्यापासून अवघ्या ६ ते ७ तासात लाचखोर हवालदारास जेरबंद करण्यात आले. पोलिसांवरील ही सहावी, तर इस्लामपुरातील दुसरी कारवाई ठरली. पवारही सुपरफास्टच..!लाचलुचपतच्या सुपरफास्ट कारवाईत गारद झालेले हवालदार लक्ष्मण पवार हे सुध्दा सुपरफास्टच होते. एखाद्या कसलेल्या कायदेपंडिताप्रमाणे त्यांच्या बोलण्याचा तोरा असायचा. या तोऱ्यातील बोलण्यातून ते समोरच्याला गलितगात्र करून टाकायचे आणि त्यातून मग ‘पट मंगनी—झट कंडका’ अशा पध्दतीने खाबूगिरी करायचे. त्यांची ही खाबूगिरीची सवयच त्यांना कारागृहाच्या उंबरठ्यावर तेवढ्याच वेगाने घेऊन गेली.