शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीच्या भिंतीला हजारो हातांची मदत...

By admin | Updated: November 17, 2016 23:29 IST

जुन्या द्या, हवे ते न्या : विश्रामबाग येथील हनुमान मंडळाचा अनोखा उपक्रम; नागरिकांकडून मिळतोय प्रतिसाद

सांगली : जुने वापरात नसलेले कपडे, चपला, शैक्षणिक साहित्य, अशा एक ना अनेक वस्तू आपण कुठेही कचऱ्यात फेकून देत असतो. पण या वस्तू गोरगरीब, गरजूंना उपयोगात येऊ शकतात. याचाच विचार करून विश्रामबाग येथील हनुमान मंडळाने अशा वस्तू जमा करीत माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. गुरुवारी मंडळाकडे कपडे, चप्पल, चष्मा फ्रेम, शैक्षणिक साहित्य अशा वस्तू जमा झाल्या. ज्यांना अंगभर घालायला कपडे नाहीत, शिकायला वह्या, कंपॉस नाही, त्यांना या वस्तूंचे मोफत वाटप मंडळाने केले. विश्रामबाग येथील सावरकर शाळेनजीक असणाऱ्या वीर हनुमान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘माणुसकीची भिंत’ हा अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते झाली. २७ नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. हनुमान मंदिराजवळ एका मंडपात माणुसकीची भिंत उभी केली आहे. या उपक्रमात सहभागी झालेले कार्यकर्ते, साहित्य देणारे हजारो हात आणि ज्यांना गरज आहे असे असंख्य गरजू जमले होते. ‘नको असेल ते द्या... हवे असेल ते घेऊन जा...’ असा अनोखा उपक्रम राबवून मंडळाचे कार्यकर्ते जुने कपडे देणाऱ्यांचा, एक झाडाचे रोप देऊन सन्मानही करतात. गुरुवारी दिवसभरात वापरात असलेले सुस्थितीतील शर्ट, पँट, जॅकेट, ब्लँकेट, स्वेटर, सलवार कमीज, साड्या, लहान मुलांचे कपडे अनेकांनी दान केले. समाजातील माणुसकी कशी सजग असू शकते, याची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम आहे. मंडळाचे कार्यकर्ते पांडुरंग गरुड, अमित कांबळे, गणेश साळुंखे, सचिन कदम, विशाल ग्राफीक्स, दीपक पाटील, सचिन टोपकर, कुणाल कासोटी, राजू कदम, अमित बेडकाळे, अमित सर्वदे, राघवेंद्र इलेजार, चेतन पाटील, महेश कर्णी अशा कार्यकर्त्यांचे हजारो हात या सामाजिक उपक्रमासाठी राबत आहेत. (प्रतिनिधी) देवही साथीला! हनुमान मंडळाच्या या उपक्रमात जुने कपडे देऊन हजारो हात सहभागी झाले आहेत. कुणी कपडे दिले, कुणी शैक्षणिक साहित्य दिले, कुणी जुन्या चपला दिल्या. एका नागरिकाने तर देवांच्या प्रतिमाही दिल्या आहेत. ज्यांना देवांच्या प्रतिमाही विकत घेता येऊ शकत नाहीत, अशा गरजूंना देवांचीही साथ मिळेल, या उद्दात हेतूने त्याने हे दान दिले आहे. सांगलीकरांना सहभागाचे आवाहन... हनुमान मंडळाच्या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर तासगाव तालुक्यातील निमणी येथील गरीब शेतकरी सकाळी अकरा वाजताच कार्यक्रमस्थळी आले होते. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी गरजेनुसार जुने कपडे घेतले. जाताना कार्यकर्त्यांना धन्यवादही दिले. सांगलीवाडीतील अजय अर्जुन हे बीएसएनएलमध्ये नोकरीस आहेत. त्यांनीही घरातील जुने कपडे इस्त्री करुन या उपक्रमासाठी दिले. अशी अनेक मंडळी मदतीचा हात देऊ लागली आहेत. आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात सांगलीकरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.