मिरजेत साडेसहा लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:32+5:302021-03-08T04:25:32+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरजेत टेम्पोतून वाहतूक करण्यात येत असलेला साडेसहा लाख रुपये किमतीचा गुटखा व ...

Gutka worth Rs 6.5 lakh seized in Miraj | मिरजेत साडेसहा लाखांचा गुटखा जप्त

मिरजेत साडेसहा लाखांचा गुटखा जप्त

लाेकमत न्यूज नेटवर्क

मिरज : मिरजेत टेम्पोतून वाहतूक करण्यात येत असलेला साडेसहा लाख रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा पाेलिसांनी हस्तगत केला. टेम्पोसह साडेसात लाखांचा ऐवज गांधी चौक पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक अकबर इस्माईल शेख (वय ४२, रा. शंभर फुटी रोड, सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी दुपारी मिरज बसस्थानक परिसरात महात्मा फुले चाैकातून जाणारा टेम्पाे क्रमांक (एमएच १० सीक्यू ०८७८) पोलिसांनी अडवला. यावेळी तपासणी केल्यानंतर टेम्पाेमध्ये अवैध गुटखा व सुगंधी तंबाखूचे बॉक्स १७ पोत्यांमध्ये भरल्याचे आढळले. या साठ्याची किंमत सुमारे साडेसहा लाख रुपये आहे. या गुटखा व तंबाखू साठ्यासह १ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करुन गुटखा व तंबाखू साठ्याची तपासणी करण्यात आली. त्यांच्या फिर्यादीप्रमाणे टेम्पोचालक अकबर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध गुटखा व तंबाखू कोठून आणला व कोठे नेण्यात येत होता, याची चाैकशी सुरु असून, याप्रकरणी आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्नाटकातून मिरजेत मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी सुरू असून, मिरजेतून इतर ठिकाणी गुटखा पाठविण्यात येत आहे. पोलिसांच्या वारंवार कारवाईनंतरही गुटखा व तंबाखू तस्करी सुरुच आहे.

Web Title: Gutka worth Rs 6.5 lakh seized in Miraj