सांगलीत हिरव्या बेदाण्याला मिळाला उच्चांकी भाव; शेतकरी-व्यापाऱ्यांत उत्साह, किती टन झाली आवक..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:38 IST2026-02-18T18:36:41+5:302026-02-18T18:38:00+5:30

दर्जेदार मालाला चांगला प्रतिसाद

Green currants fetch highest price in Sangli, Farmers and traders are excited | सांगलीत हिरव्या बेदाण्याला मिळाला उच्चांकी भाव; शेतकरी-व्यापाऱ्यांत उत्साह, किती टन झाली आवक..जाणून घ्या

सांगलीत हिरव्या बेदाण्याला मिळाला उच्चांकी भाव; शेतकरी-व्यापाऱ्यांत उत्साह, किती टन झाली आवक..जाणून घ्या

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू हंगामातील बेदाणा सौद्याचा बुधवारी उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट प्रतीच्या हिरव्या बेदाण्यास तब्बल ४०१ रुपये प्रति किलो, असा उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. हंगामाच्या पहिल्याच दिवशी २१ दुकानांतून दहा गाड्यांतून सुमारे १०० टन नव्या बेदाण्याची आवक झाली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

बेदाणा सौदा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सभापती सुजय शिंदे, संचालक पप्पू मजलेकर, काडप्पा वारद, सचिव महेश चव्हाण यांच्या हस्ते सौद्याचा शुभारंभ झाला. प्रमुख व्यापारी, शेतकरी व आडते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन हंगामातील सर्वाधिक भाव तीर्थंकर सेल्स कार्पोरेशन या दुकानात मिळाला. राजकुमार सदाशिव शिंगण्णा (वड्डी) या शेतकऱ्यांच्या २६ बॉक्स हिरव्या बेदाण्यास ४०१ रुपये प्रति किलो दर मिळाला. हा माल अभिजीत ट्रेडर्स यांनी उच्चांकी दराने खरेदी केला. उत्कृष्ट प्रतीच्या हिरव्या बेदाण्यास ३३१ ते ४०१ रुपये, मध्यम हिरव्या बेदाण्यास २५० ते ३२० रुपये, तर काळ्या बेदाण्यास १२० ते १८० रुपये प्रति किलो, असा सरासरी भाव मिळाला. दर्जेदार मालाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

सौद्यावेळी मनोज मालू, सतीशभाई पटेल, सिद्धार्थ पटेल, नितीन मर्दा, पनू सारडा, विनायक हिंगमिरे, मुकेश केसरी, पवन चौगुले, रवी हजारे, विनोद कबाडे, अभिजीत पाटील, शेखर ठक्कर, परेश मालू, राजयोग कबाडे, सुनील हडदरे, शरद पाटील, ऋषभ शेडबाळे, कृष्णा मर्दा, विनीत गड्डे, प्रवीण यादवाडे, दिगंबर यादव, जितू शेटे, देवेंद्र करे आदींसह अनेक शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.

बेदाण्यास उच्चांकी दर मिळणार : सुजय शिंदे

सभापती सुजय शिंदे म्हणाले, यंदा द्राक्ष छाटणी उशिरा झाल्याने आणि लागवड कमी झाल्यामुळे उत्पादनात घट आहे. त्याचबरोबर बाजारातील मागणी व मार्केटिंगचा दर चांगला असल्याने चालू वर्षी बेदाण्यास साडेतीनशे ते चारशे रुपये प्रति किलोपेक्षा अधिक दर मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार बेदाणा सांगली बाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आवाहनही त्यांनी केले

Web Title : सांगली में किशमिश की नीलामी: किसानों के लिए रिकॉर्ड कीमतों से खुशी

Web Summary : सांगली बाजार में किशमिश की नीलामी की मजबूत शुरुआत हुई। हरी किशमिश ₹401/kg के रिकॉर्ड मूल्य पर बिकी। 21 दुकानों से 100 टन की आवक हुई। किसानों को लाभान्वित करते हुए उच्च कीमतों और कम उत्पादन की उम्मीद है।

Web Title : Sangli Raisin Auction: Record Prices Bring Cheer to Farmers

Web Summary : Sangli market sees a strong start to raisin auctions. Green raisins fetched a record ₹401/kg. 100 tons arrived from 21 shops. High prices and lower production expected to continue, benefiting farmers.