शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’तर्फे सुदृढ बालक स्पर्धा

By admin | Updated: August 11, 2015 22:15 IST

जॉन्सन्स बेबी प्रायोजक : गुरुवारी कच्छी समाज जैन भवन येथे आयोजन

सांगली: सुदृढ आणि स्वस्थ बाळांचे कौतुक करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे जॉन्सन्स बेबी व इंडियन अकॅडमी आॅफ पेडिअ‍ॅट्रिक्सच्या सहकार्याने गुरुवारी (दि. १३) सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बाळाचे आरोग्य आणि पालनपोषणाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. गुटगुटीत बाळाच्या चेहऱ्यावरील हास्यापेक्षा आई-वडिलांना अधिक मौल्यवान काय असू शकते? परंतु या नाजूक जिवाची काळजी घेणे हे फार जिकिरीचे काम असते. एक शतकापासून ‘जॉन्सन्स बेबी’ची सर्व उत्पादने लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मातांची आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पहिली पसंती राहिली आहे. वैद्यकीय परीक्षणांतून सिद्ध झालेली ‘जॉन्सन्स बेबी’ची सर्व उत्पादने बाळाच्या अत्यंत नाजूक त्वचेला सहन होतील, अशीच तयार केली जातात. लहान बाळाचे डोळे, त्वचा आणि केस यांच्या गरजांकडे विशेष लक्ष देऊन सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक अशी तिहेरी लाभयुक्त (जॉन्सन्स बेबी ट्रिपल बेबी प्रोटेक्शन) उत्पादने पालकांचा विश्वास टिकवून आहेत. बाळाच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून पालकांनी त्याला सर्व संकटांपासून वाचविण्याचे वचन दिलेले असते. त्या वचनपूर्ततेसाठी ‘जॉन्सन्स’ सर्वश्रेष्ठ उत्पादनांसह सदैव तत्पर आहे. इंडियन अकॅडमी आॅफ पेडिअ‍ॅट्रिक्स (आयएपी), सांगली ही मुलांच्या आरोग्य विकासासाठी कार्य करणारी भारतातील बाल-चिकित्सकांची सर्वांत मोठी संस्था आहे. या स्पर्धेत पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आयएपी’ सांगली शाखेच्या अध्यक्षांकडून करण्यात आले आहे. स्पर्धेस डॉ. कुल्लोळी इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग, विश्रामबाग यांचे सहकार्य लाभत आहे. (प्रतिनिधी)आकर्षक बक्षिसेही स्पर्धा ० ते १, १ ते ३ वर्षे आणि ३ ते ५ वर्षे अशा तीन गटांत होणार आहे. प्रत्येक गटातील स्पर्धकांना आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. सर्व स्पर्धकांनी बाळाचा जन्मदाखला, वयाचा पुरावा आणि वैद्यकीय उपचार व लसीकरणाची कागदपत्रे नावनोंदणी करतेवेळी सादर करणे गरजेचे आहे. ही स्पर्धा कच्छी समाज जैन भवन, सांगली-मिरज रोड, सांगली येथे गुरुवारी दुपारी दोन वाजता होणार असून, नावनोंदणीसाठी लोकमत कार्यालय, कलाश्री आर्केड बिल्डिंग, दुसरा मजला, राममंदिर चौक, सांगली येथे तसेच ९६०४०८८३८८ किंवा ०२३३-२६२५९६२/३ येथे संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.