शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत २ रोजी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्सचे महाअधिवेशन

By admin | Updated: April 30, 2015 00:21 IST

शीतल शहा : केंद्रीय ऊर्जामंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

सांगली : फेडरेशन आॅफ इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्यावतीने (फेकॅम) येथे २ मेपासून ‘ऊर्जा प्रकाशोत्सव २०१५’ हे राज्यस्तरीय महाअधिवेशन होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महाअधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती ‘फेक ॅम’चे अध्यक्ष शीतल शहा यांनी दिली.सांगलीत विष्णुदास भावे नाट्यगृहात होणाऱ्या या महाअधिवेशनाच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून राज्याचे सहकारमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजयकाका पाटील उपस्थित राहणार आहेत. विविध चर्चासत्रांचे तसेच प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. महाअधिवेशनात ‘नवीन तंत्रज्ञान, व्यवसायातील संधी’ यावर चर्चासत्रे आयोजित केली आहेत. अधिवेशनास राज्यभरातून इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्टस्, बिल्डर्स, उद्योजक, कृषितज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त तरुण भारत स्टेडियममध्ये भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात देशभरातील नामवंत औद्योगिक कंपन्या सहभागी होणार आहेत. फेडरेशन आॅफ इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ही राज्यातील जिल्हा संघटनांची शिखर संस्था आहे. राज्यभरात १३००० पेक्षा जास्त परवानाधारक विद्युत ठेकेदार आहेत. या संघटनेशी राज्यातील २१ जिल्हा संघटना संलग्न आहेत. या सर्व संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर्स व सल्लागार, शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.दि. ४ मे रोजी दुपारी १२.३० वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मुख्य अभियंता (विद्युत) संदीप पाटील यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. यावेळी वरिष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. प्रदीप देशमुख उपस्थित राहणार आहेत. सिकंदर अत्तार, मोहन हुन्नूर, प्रशांत पाटील, मेहबूब शिरोळकर, अमोल संकपाळ, सौ. गौरी बर्वे, अभी कुलकर्णी, महेश चिपलकट्टी, रवींद्र चौधरी, अभिजित भोसले, संजय कोडग, वाय. के. पाटील, मिलिंद कुलकर्णी, प्रमोद पत्की, अजित सूर्यवंशी, आय. जी. पाटील, अशोक चव्हाण संयोजन करीत आहेत. (प्रतिनिधी)