इस्लामपुरात गॅरेज, सायकल दुकानाला आग,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST2021-02-05T07:28:19+5:302021-02-05T07:28:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरातील मटण मार्केटसमोरील गॅरेज आणि सायकल दुकानाला आग लागून सुमारे एक लाखाहून अधिक साहित्याचे ...

Garage in Islampur, bicycle shop on fire, | इस्लामपुरात गॅरेज, सायकल दुकानाला आग,

इस्लामपुरात गॅरेज, सायकल दुकानाला आग,

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शहरातील मटण मार्केटसमोरील गॅरेज आणि सायकल दुकानाला आग लागून सुमारे एक लाखाहून अधिक साहित्याचे नुकसान झाले. पहाटे चार ते सहाच्या दरम्यान ही आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. इस्लामपूर पालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत ही आग आटोक्यात आणली.

अन्वर शौकत शेख आणि संभाजी बापू केंडे २० वर्षांपासून या परिसरात व्यवसाय करतात. शेख यांचे गॅरेज, तर केंडे यांचे सायकल दुकान आहे. पहाटे ही आग लागल्यानंतर गॅरेजमधील जमिनीवर पडलेल्या तेलाने पेट घेतल्यामुळे ती भडकत गेली. या आगीत शेख यांचे गॅरेज व आतील साहित्य पूर्णपणे बेचिराख झाले होते. या आगीच्या लोटांनी केंडे यांच्या दुकानालाही भस्मसात करून टाकले. दुकानातील सायकली, साहित्य आणि हवा भरण्याचा कॉम्प्रेसर आगीत जळून खाक झाले. केंडे यांचे या आगीत ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पहाटेच्या वेळी आग लागल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

फोटो - ०१०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर फायर न्यूज

Web Title: Garage in Islampur, bicycle shop on fire,