सामूहिक बलात्कार करून महिलेची विक्री; मिरजेतील सात जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 05:52 IST2024-02-09T05:52:06+5:302024-02-09T05:52:35+5:30

मिरजेतील सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Gang rape and sale of women; Seven people arrested in Miraj | सामूहिक बलात्कार करून महिलेची विक्री; मिरजेतील सात जणांना अटक

सामूहिक बलात्कार करून महिलेची विक्री; मिरजेतील सात जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : पुणे जिल्ह्यातील विवाहित तरुणीवर मिरज व जमखंडी येथे सामूहिक बलात्कार करून तिची कर्नाटकात चार लाखांना विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी येथील गांधी चौक पोलिस ठाण्यात  तीन महिलांसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मिरजेतील सात जणांना अटक करण्यात आली आहे.  

मोहम्मद हुसेन ऊर्फ मच्छर हनी सिंग मोहम्मद गौर शेख, अबुजा फारुख जमादार, महंमद साजीश शमशुद्दीन मुल्ला, महम्मद ऊर्फ सर्व शेरखान फकीर, खालीद मुबारक कोरबू, त्यांना मदत करणारे जुबेद ऊर्फ कपाला शब्बीर शेख, संतोषी नाशिककर ऊर्फ किरण फकीर (रा. मिरज) यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या एका महिलेस अटक करण्यात आली आहे.

विकत घेणाऱ्याने आणून सोडले
दरम्यान तरुणीला विकत घेणाऱ्यास  तिच्यावर अत्याचार झाल्याचे समजले. त्याने मिरजेत ख्वाजा वसाहतीत आरोपींकडे तिला आणून सोडले आणि दिलेले चार लाख परत नेले. यानंतर पीडितेने पुण्यात जाऊन पोलिसांत तक्रार दिली. 

झोप लागली अन्...
पुण्यातील विवाहित तरुणी तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी कऱ्हाडला रेल्वेने निघाली होती. रेल्वेत झोप लागल्याने कऱ्हाड येथे न उतरता ती मिरजेत उतरली. मिरजेतून परत कऱ्हाडला जाण्यास लवकर रेल्वे नसल्याने ती मिरज रेल्वे स्टेशनच्या बाहेर आली.
यावेळी आरोपी मच्छर ऊर्फ हनिसिंग व त्यांच्या मित्राने तिला झुडपात नेऊन बलात्कार केला. त्यांनतर पाच जणांनी पीडितेला पकडून जबरदस्तीन अत्याचार केले.
पुन्हा रेल्वे पुलाजवळील कामगाराच्या एका पत्र्याच्या रूममध्ये कोंडून तेथे एकाने तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर आरोपींनी मिरजेतील एका महिलेच्या मदतीने कर्नाटकातील जमखंडी येथे तिला नेऊन पुन्हा सामूहिक बलात्कार केला.  जमखंडीतील दोन महिलांच्या मदतीने तिला चार लाखांना विकून तिचे लग्न लावून दिले. 

 

Web Title: Gang rape and sale of women; Seven people arrested in Miraj