शहरं
Join us  
Trending Stories
1
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
2
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
3
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
4
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी वाराणसीबाबत अजय राय यांनी दिला असा मेसेज, वाढू शकतं मोदींचं टेन्शन
5
Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'
6
गुरुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वृद्धी योग; वरदान काळ, तुमची रास कोणती?
7
Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'
8
BEST Bus Breakdowns: नुसता वैताग! बेस्ट बस भर रस्त्यात बंद पडण्याचं प्रमाण वाढलं, ६ महिन्यांत २११ वेळा घटना
9
सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा
10
'मधुबाला' फेम अभिनेत्रीने लग्नानंतर ९ वर्षांनी दिली गुडन्यूज, वयाच्या 38 व्या वर्षी देणार बाळाला जन्म
11
Kangana Ranaut : कंगनाला मिळणार इतका पगार; मोफत घरासह आलिशान सुविधा, खासदार झाल्यावर बदलणार आयुष्य
12
National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
13
Durgashtami: आज शुक्रवार आणि दुर्गाष्टमी, या संयोगावर घरच्याघरी करा लक्ष्मी कुंकुमार्चन; होतील अनेक लाभ!
14
"फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट
15
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण?
16
खासदार होताच युसूफ अडचणीत; गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी नोटीस
17
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
18
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचं आमंत्रण मिळाल्यावर पूनम ढिल्लो म्हणाल्या, "जहीर, प्लीज तिला..."
19
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
20
PHOTOS : अमेरिकेत 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज! भारतीय शिलेदाराची पत्नीसोबत भटकंती

Sangli: मनोज जरांगे-पाटलांच्या रॅलीतून रोकड लांबविणाऱ्या चोरट्यांची टोळी जेरबंद, दीड लाखाची रक्कम जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 3:23 PM

मनोज जरांगे-पाटील यांच्या सांगली जिल्हा दौऱ्यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन लोकांच्या खिशातील रोख रक्कम लंपास

दिलीप मोहिते विटा : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या सांगली जिल्हा दौऱ्यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन लोकांच्या खिशातील रोख रक्कम लंपास करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील ९ सराईत चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात विटा पोलीसांना काल, रविवारी यश आले. यावेळी पोलीसांनी चोरट्यांकडून १ लाख ३९ हजार २०० रूपयांची रोकड जप्त केली आहे.याप्रकरणी सूरज उध्दव पवार (वय २७), रमाकांत आनंदा कांबळे (वय ३६), आकाश साहेबराव वाघमारे (वय २४), राजेश विठ्ठल शाहीर (वय ३४), अविनाश लालासाहेब कांबळे (वय २७), दत्ता लालासाहेब कांबळे (वय २८), अक्षय शिवाजी सनमुखराव (वय ३४), विलास लक्ष्मण शिंदे (वय २६, सर्व रा. राजीवनगर, लातूर, जि. लातूर) व बिलाल गुलाब नबीखान (वय ५४, रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी अटक केलेल्या ९ संशयितांची नावे आहेत.मनोज जरांगे-पाटील हे दि. १७ नोव्हेंबरला सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मायणी ते सांगली राज्यमार्गावरून येताना मराठा कार्यकर्त्यांनी अनेक गावात त्यांचे जंगी स्वागत केले. त्यावेळी प्रत्येक गावात ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली होती.नागेवाडी (ता.खानापूर) येथे झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन सरपंच सतीश निकम यांच्यासह सहा जणांच्या खिशातून या चोरट्यांनी सुमारे ७८ हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केली. त्यानंतर विटा येथील जाहीर सभेवेळी याच चोरट्यांनी एकाच्या खिशातून १८ हजार रूपये तर तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे गर्दीचा फायदा  घेऊन याच टोळीने तिघांच्या खिशातून ४४ हजार रूपयांची रोकड लंपास केली.याप्रकरणी विटा व तासगाव पोलीसांत गुन्हा दाखल झाला होता. विटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी या गुन्ह्याच्या तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विटा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला रविवारी विटा बसस्थानक परिसरात ७ ते ८ इसम संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक पद्मा कदम, पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांना ताब्यात घेतले.त्यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या दौऱ्यावेळी नागेवाडी, विटा व शिरगाव येथून रोकड लंपास केल्याची कबुली दिली. याप्रकरणी लातूर जिल्ह्यातील ९ सराईत चोरट्यांच्या टोळीला विटा पोलीसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातील १ लाख ३९ हजार २०० रूपयांची रोकड जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस