शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्के वाढ

By admin | Updated: September 16, 2015 12:09 IST

मूर्तींची संख्या वाढली : शाडूच्या मूर्तींचे आठ दिवसांपूर्वीच बुकिंग फुल्ल

सांगली : विविध आकारातील, विविध रूपातील गणेशमूर्तींची सांगलीच्या बाजारपेठेत गर्दी झाली असली तरी, यंदा मूर्तींचे दर गतवर्षाच्या तुलनेत २५ ते ३० टक्के वाढले आहेत. त्यामुळे भाविकांकडून छोट्या आकारातील मूर्तींना मागणी वाढल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले. दुसरीकडे पर्यावरणपूरक मूर्तींबाबत झालेल्या जागृतीमुळे बाजारातील शाडूच्या गणेशमूर्तींचे बुकिंग फुल्ल झाले आहे. सांगलीच्या बाजारपेठांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचे स्टॉल सजले आहेत. मारुती रोड, हरभट रोड, शिवाजी मंडई परिसर, गावभाग याठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्टॉल लागले आहेत. घरगुती गणेशमूर्तींना यंदा महागाईची झळ पोहोचली आहे. प्लॅस्टर व रंगाच्या दरामध्ये वाढ होण्याबरोबरच वाहतुकीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे या दरवाढीचा मूर्तींच्या किमतीवर परिणाम झाला आहे. बाजारात सध्या १५० पासून ३ हजार रुपयांपर्यंतच्या घरगुती गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यंदा २५ ते ३० टक्के दरवाढ झाल्यामुळे भाविकांनी मोठ्या मूर्तींपेक्षा छोट्या मूर्ती खरेदी करण्याला पसंती दिली आहे. बाजारात उत्साह दिसून येत असला, तरी यंदा सांगलीच्या बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर मूर्ती दाखल झाल्या आहेत. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत बुकिंगमध्ये घट झाल्याचे दिसून येते. तरीही बहुतांश विक्रेत्यांकडे ५० टक्के मूर्तींचे बुकिंग झाले आहे. सांगलीसह कोल्हापूर, इचलकरंजी, मुंबई, पुणे या ठिकाणांहून मूर्ती आल्या आहेत. मूर्ती विक्रीच्या स्टॉलच्या संख्येतही वाढ झाली आहे. ‘जय मल्हार’चा प्रभाव गणेशमूर्तींवर यंदा ‘जय मल्हार’ या टीव्ही मालिकेचा सर्वाधिक प्रभाव पडला आहे. मल्हार रूपातील गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणावर सांगलीत दाखल झाल्या आहेत. भाविकांनीही त्याचपद्धतीच्या मूर्तींना सर्वाधिक पसंती दिली आहे. मल्हार रूपातील मूर्तींबरोबरच लालबागच्या राजालाही भाविकांची मागणी आहे. प्रभावळ, दगडूशेठ मूर्तींनाही मागणी आहे. निसर्गपूरक मूर्ती म्हणून शाडूच्या मूर्तींना यंदा मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक संघटनांनी याबाबत मोठी जागृती केल्यामुळे शाडूच्या मूर्ती खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. मागणीच्या तुलनेत शाडूच्या मूर्तींची संख्या कमी असल्यामुळे उत्सवाच्या चार दिवस अगोदरच या मूर्तींचे बुकिंग फुल्ल झाले आहे. शाडूच्या मूर्तीचे दर प्लॅस्टरच्या मूर्तींपेक्षा अधिक आहेत. २५० रुपयांपासून ३००० रुपयांपर्यंत मूर्तींचे दर आहेत. (प्रतिनिधी)