शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गाडगीळ ठरले ‘जायंट किलर’

By admin | Updated: October 20, 2014 00:40 IST

चौदा हजारांचे मताधिक्य : सांगलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

सांगली : सर्व निवडणूक चाचण्या फोल ठरवत भाजपचे नवखे उमेदवार धनंजय ऊर्फ सुधीर हरी गाडगीळ यांनी आज (रविवार) सांगली विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून भाजपला पहिल्यांदाच यश मिळवून दिले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार, माजी मंत्री मदन पाटील यांचा १४ हजार ४५७ मताधिक्याने पराभव केला. शिवसेनेचे उमेदवार पृथ्वीराज पवार हे तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यांना ३४ हजार ६३५ मते मिळाली. सांगली विधानसभेसाठी १५ आॅक्टोबररोजी मतदान झाले होते. एकूण १ लाख ९५ हजार ९८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज येथील मिरज रस्त्यावरील शासकीय गोदामामध्ये मतमोजणी घेण्यात आली. यामध्ये ८० हजार ४९७ मते मिळवून भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी विजय मिळवला. कॉँग्रेसचे मदन पाटील यांना ६६ हजार ४० मते मिळाली. त्यांचा १४ हजार ४५७ मतांनी पराभव झाला. आ. संभाजी पवार यांचे पुत्र व शिवसेनेचे उमेदवार पृथ्वीराज पवार यांना ३४ हजार ६३५ मते मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश पाटील हे चौथ्या स्थानावर राहिले. त्यांना ४ हजार ७१८ मते मिळाली. पाचव्या स्थानावर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मुन्ना कुरणे राहिले. त्यांना १ हजार ३५४ मते मिळाली. दुपारी साडेतीन वाजता सुधीर गाडगीळ यांना सांगली विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी विजयी घोषित करून त्यांना प्रमाणपत्र दिले. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सुधीर गाडगीळ गोदामाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. त्यानंतर विश्रमाबाग येथील भाजप कार्यालयापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पहिल्या फेरीत शिवसेनेचे पृथ्वीराज पवार हजार मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीपासून सहाव्या फेरीपर्यंत काँग्रेसचे मदन पाटील यांचे वर्चस्व राहिले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. सातव्या फेरीमध्ये सर्वच चित्र बदलले. सातव्या फेरीअखेर गाडगीळ यांनी २ हजार १३५ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर त्यांचे मताधिक्य प्रत्येक फेरीत वाढतच गेले. चौदाव्या फेरीमध्ये त्यांचे मताधिक्य दोन हजाराने घटले. त्यानंतर त्यांचे मताधिक्य वाढत राहिले. २१ व्या फेरीनंतर १४,४५७ एवढे मताधिक्य मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजी करून दिवाळी साजरी केली.(प्रतिनिधी)आघाडीच्या कारभारानेच माझा विजय : गाडगीळ आघाडी सरकारच्या गलथान आणि भ्रष्ट कारभारामुळे जनतेने मला विजय मिळवून दिला. नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाला जनतेने साथ दिली आहे. हा विजय जनतेचा आहे. आघाडीला जनता कंटाळली होती. माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. -सुधीर गाडगीळ, भाजप उमेदवार.५१७ टपाली मते बादसांगली विधानसभा मतदार संघातील १५७३ पैकी ५१७ टपाली मते बाद ठरली आहेत. शिक्षकांनी मान्यतेसाठी कार्यकारी अधिकारी ऐवजी मुख्याध्यापकांचा शिक्का आणि सही वापरली. ही मते प्रशासनाने बाद ठरवली. संघटना मजबूत करुनवीन पक्ष, संघटना असतानाही ३५ हजारापर्यंत मते मिळाली ही किमया तरुणांमुळे झाली. आपण दिलेल्या लढ्याबाबत समाधानी आहोत. तरुणांचे संघटन मजबूत करणार आहे.-पृथ्वीराज पवार, शिवसेना उमेदवार.