शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी सभापती पदाचे भवितव्य नाराजांच्या हाती

By admin | Updated: September 7, 2015 22:45 IST

आज निवडी : संतोष पाटील-शेडजी मोहिते यांच्यात लढत; इच्छुकांच्या मनधरणीचे प्रयत्न जोमात

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेसचे संतोष पाटील व राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते यांच्यात सरळ लढत होत आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजता सभापती पदाची निवड होईल. संतोष पाटील यांच्या उमेदवारीने काँग्रेसमधील इच्छुकांनी नाराजीचा सूर आळवला आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचे काम सुरू असून, त्याला यश मिळाले तर, पाटील यांच्या निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस कितपत जोर लावते, यावर सभापती पदाचे गणित अवलंबून आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेत सभापतींची निवड होईल. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिमदिवशी काँग्रेसने संतोष पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले; तर राष्ट्रवादीकडून कुपवाडचे शेडजी मोहिते यांनी अर्ज दाखल केला आहे. पाटील, मोहिते यांच्यात खरी लढत असली तरी, नाराजांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. संतोष पाटील यांच्या नावाची घोषणा काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी केले. मदनभाऊंनी दूरध्वनीवरून पाटील यांचा अर्ज दाखल करण्याची सूचना महापौर विवेक कांबळे व गटनेते किशोर जामदार यांना केली. पाटील यांना उमेदवारी मिळताच इतर इच्छुक दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे यांच्यात नाराजी पसरली. दुर्वे यांनी बंडखोर म्हणून अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला; तर दिलीप पाटील यांनी स्थायी समिती सदस्य पदाचाच राजीनामा दिला आहे. त्यामुळे उद्या सभेला दिलीप पाटील उपस्थित राहणार का? याकडे काँग्रेस सदस्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसमधील पाच सदस्य पाटील यांच्या उमेदवारीवर नाराज आहेत. यातील एक-दोन सदस्य वगळता सारेच नगरसेवक मदन पाटील यांचा शब्द अंतिम मानतात. त्यामुळे या सदस्यांनी उघड नाराजी व्यक्त केली असली, तरी ते काँग्रेसच्याविरोधात जाणार नाहीत, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला सभापती पदाच्या निवडीत फारसा रस घेतला नव्हता. केवळ विरोधक म्हणून शेडजी मोहिते यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. पण आता सारीच समीकरणे बदलल्याने राष्ट्रवादीनेही गणित जुळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण आता सारीच समीकरणे बदलल्याने राष्ट्रवादीनेही गणित जुळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. (प्रतिनिधी)...तरच गणित जुळेल!स्थायी समितीत काँग्रेसचे नऊ, राष्ट्रवादीचे पाच व स्वाभिमानी आघाडीचा एक सदस्य आहे. काँग्रेसमधील पाच नाराजांपैकी शिवाजी दुर्वे व दिलीप पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे. पाटील यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने ते उद्याच्या सभेत हजर राहणार नाहीत. त्यात दुर्वे, स्वाभिमानीचा एक व राष्ट्रवादीचे पाच असे सात संख्याबळ होऊ शकते. काँग्रेसचे संख्याबळ सात होईल. पण या गोष्टी ‘जर-तर’च्या आहेत. पाचजण नाराजकाँग्रेसमधील स्थायी समितीचे पाच सदस्य संतोष पाटील यांच्या उमेदवारीने नाराज आहेत. त्यातील चार सदस्य अज्ञातवासात गेले होते. सायंकाळी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे दूरध्वनी बंद होते. रात्रीपर्यंत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. हे सदस्य काँग्रेसच्याच नगरसेवकासोबत असल्याचाही दावा केला जात होता. त्यांची नाराजी दूर करण्याचे काम सुरू असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. पाचजण नाराजकाँग्रेसमधील स्थायी समितीचे पाच सदस्य संतोष पाटील यांच्या उमेदवारीने नाराज आहेत. त्यातील चार सदस्य अज्ञातवासात गेले होते. सायंकाळी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे दूरध्वनी बंद होते. रात्रीपर्यंत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. हे सदस्य काँग्रेसच्याच नगरसेवकासोबत असल्याचाही दावा केला जात होता. त्यांची नाराजी दूर करण्याचे काम सुरू असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. सभापती पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आल्याने गटनेते किशोर जामदार यांनी सदस्यांना पक्षादेश (व्हीप) बजाविला आहे. दुपारीच व्हीपची नोटीस बजाविण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. सभापती निवडीवेळी दगाफटका होऊ नये, याची खबरदारी जामदार यांच्याकडून घेतली जात आहे, तर नाराज सदस्यांची समजूत काढण्याची जबाबदारी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.