Sangli- गिरगाव खून प्रकरणातील फरार संशयितास अटक, तीन दिवसाची पोलीस कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 12:30 IST2023-09-21T12:29:47+5:302023-09-21T12:30:27+5:30

जत : गिरगाव (ता.जत) येथे महादेवाप्पा राजशेखर हिरेमठ  (वय-३५) यांच्या खून प्रकरणातील संशयित फरारी आरोपीस उमदी पोलिसांनी अटक केली. ...

Fugitive suspect in Sangli Girgaon murder case arrested, three days in police custody | Sangli- गिरगाव खून प्रकरणातील फरार संशयितास अटक, तीन दिवसाची पोलीस कोठडी 

Sangli- गिरगाव खून प्रकरणातील फरार संशयितास अटक, तीन दिवसाची पोलीस कोठडी 

जत : गिरगाव (ता.जत) येथे महादेवाप्पा राजशेखर हिरेमठ  (वय-३५) यांच्या खून प्रकरणातील संशयित फरारी आरोपीस उमदी पोलिसांनी अटक केली. संशयित दत्ता यल्लाप्पा बजंत्री (रा. कुंभार गल्ली विजयपूर) असे त्याचे नाव आहे. त्याला जत न्यायालयासमोर हजर केले असता २४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

गिरगाव (ता.जत) येथे सुखदेव साबू ब्याळकुळी यांच्या घरासमोरील पत्रा शेड मधील कट्ट्यावर दारूच्या नशेत महादेवाप्पा हिरेमठ याचा दत्ता बजंत्री याने धारदार शस्त्राने वार करून २८ जानेवारीला खून केला होता. याची फिर्याद प्रशांत चंद्रकांत हिरेमठ यांनी उमदी पोलिसांत दिली होती. मयत व आरोपी दोघेही गिरगाव येथे घर बांधकामाचे काम करीत होते. खून झाल्यासून संशयित आरोपी दत्ता बजंत्री फरार होता. 

उमदी पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप शिंदे यांनी तपास  करून संशयित आरोपी दत्ता बजंत्री यास ताब्यात घेऊन  अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे करीत आहेत.

Web Title: Fugitive suspect in Sangli Girgaon murder case arrested, three days in police custody