शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात सभापतीसाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: August 27, 2015 23:17 IST

बाजार समिती : ३ सप्टेंबरला होणार निवडी, यंदा संधी खानापूर की कडेगावला?

विटा : विटा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना, कॉँग्रेस व भाजप युतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आता सभापतीपदासाठी भाऊगर्दी झाली असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दि. ३ सप्टेंबरला निवड होणार आहे. खानापूर तालुक्यातील कॉँग्रेसचे आनंदराव पाटील व शिवसेनेचे राहुल साळुंखे आणि चंद्रकांत चव्हाण यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, सभापतीपद खानापूर की कडेगाव तालुक्याला द्यायचे, याबाबतचा अंतिम निर्णय नेतेमंडळींच्या बैठकीतच होणार आहे.खानापूर व कडेगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी युती केली होती, तर या युतीला कॉँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून लढत दिली होती. या निवडणुकीत शिवसेना, भाजप व कॉँग्रेस युतीला निर्विवाद बहुमत मिळाले. विरोधी पॅनेलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते.या निवडणुकीनंतर आता सभापती व उपसभापती पदासाठी दि. ३ सप्टेंबरला निवड प्रक्रिया होत आहे. इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम समर्थक मंगरूळचे आनंदराव पाटील, करंजे येथील भानुदास सूर्यवंशी, उपाळे-वांगीचे आनंदा माने यांच्यासह शिवसेनेचे आ. अनिल बाबर समर्थक कमळापूरचे राहुल साळुंखे, तांदळगावचे चंद्रकांत चव्हाण आदी इच्छुकांनी नेत्यांना साकडे घातल्याचे वृत्त आहे. (वार्ताहर)एक वर्षासाठी मिळणार संधी सभापतीपद पहिल्यांदा कोणत्या तालुक्याला द्यायचे, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. दि. ३ सप्टेंबरला निवड प्रक्रिया होणार असल्याने त्यापूर्वी एक दिवस अगोदर आ. अनिल बाबर, मोहनराव कदम व पृथ्वीराज देशमुख यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सभापतीपदाचा अंतिम निर्णय होणार असून, या पदावर प्रत्येकी एक वर्षासाठी संधी देण्यात येणार असल्याचे समजते. सभापती व उपसभापती पदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम समर्थक मंगरूळचे आनंदराव पाटील, करंजे येथील भानुदास सूर्यवंशी, उपाळे-वांगीचे आनंदा माने यांच्यासह शिवसेनेचे आ. अनिल बाबर समर्थक कमळापूरचे राहुल साळुंखे, तांदळगावचे चंद्रकांत चव्हाण आदी इच्छुकांनी नेत्यांना साकडे घातले आहे. ३ सप्टेंबरच्यापूर्वी दोन दिवस अगोदर सभापती व उपसभापतींची निवडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.