Sangli Accident: यात्रेला जाताना काळाचा घाला; ऊस वाहतूक ट्रॅक्टरला पाठीमागून कारची धडक, चार युवक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:04 IST2025-12-04T16:04:10+5:302025-12-04T16:04:57+5:30
अपघातातील सर्व मृत सिद्धापूर गावचे रहिवासी

Sangli Accident: यात्रेला जाताना काळाचा घाला; ऊस वाहतूक ट्रॅक्टरला पाठीमागून कारची धडक, चार युवक ठार
शिरगुप्पी : विजापूर - बेळगाव या महामार्गावरील सिद्धापूर (ता. जमखंडी) येथे मंगळवारी रात्री झालेल्या ट्रॅक्टर व कारच्या अपघातात चार युवकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले सर्वच युवक सिद्धापूर (ता. जमखंडी) गावचे रहिवासी असून ते यात्रेला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी रात्री सिद्धापूर (ता. जमखंडी ) येथील रहिवासी विश्वनाथ कंबर ( वय १७ ) प्रवीण शेडबाळ( वय २२) गणेश अरळीमट्टी (वय २०) व प्रज्वल शेडबाळ ( वय १७) हे सर्वजण चारचाकीने शिरोळ येथील काडसिद्धेश्वर यात्रेला निघाले होते.
सिद्धापूर येथील प्रभू लिंगेश्वर साखर कारखान्याजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून त्यांच्या चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने या अपघातात सर्व चार युवक जागीच ठार झाले. या घटनेची नोंद जमखंडी ग्रामीण पोलिस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे.