शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

शालेय क्रीडा स्पर्धेतील चार खेळ वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: August 22, 2015 00:52 IST

स्पर्धा आयोजनास स्थगिती : क्रीडा विभागाचा निर्णय; सायकलिंग-तायक्वांदोचा समावेश

सांगली : शालेय क्रीडा स्पर्धेतील चार खेळ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यामध्ये सायकलिंग, तायक्वांदो, किक बॉक्सिंग व चायक्वांदो या खेळांचा समावेश आहे. संघटनांमधील वादाचा फटका या खेळांना बसला आहे. यावर्षी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये या चार खेळांच्या स्पर्धा आयोजनास राज्याच्या क्रीडा संचालनालयाने स्थगिती दिली आहे. या स्थगिती आदेशाचे परिपत्रक क्रीडा संचालनालयाने १२ आॅगस्ट २०१५ रोजी काढले असून, त्यावर क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे यांची स्वाक्षरी आहे. राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक व सर्व जिल्हा क्रीडाधिकारी यांना हे परिपत्रक पाठवण्यात आले आहे. परिपत्रकात म्हटले आहे की, सायकलिंग, तायक्वांदो, किक बॉक्सिंग व चायक्वांदो या खेळांच्या राज्यस्तरावर दोन-दोन समांतर संघटना आहेत. दोन्ही संघटनांकडून ‘आम्ही अधिकृत असून, शालेय स्पर्धेसाठी तांत्रिक सहकार्य आमच्या संघटनेकडून घेण्यात यावे’ अशी विनंतीपत्रे क्रीडा संचालनालयास सादर करण्यात आली आहेत. वाद असलेल्या खेळांच्या एकविध संघटनांपैकी अधिकृत संघटना कोणती, याबाबत निर्णय घेण्यास काही कालावधी लागणार आहे. संघटनांच्या वादामुळे स्पर्धेचे आयोजन विस्कळीत होऊन त्याचा परिणाम खेळाडूंवर होऊ नये, यासाठी वरील चारही खेळांचे स्पर्धा आयोजन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. (क्रीडा प्रतिनिधी) नियंत्रणच नाही... शालेय क्रीडा स्पर्धेत पूर्वी केवळ वीस पंचवीस खेळच असायचे. हळूहळू या खेळांची संख्या वाढत जाऊन आज ती ८१ पर्यंत पोहोचली आहे. बऱ्याच खेळांची नावे, नियम आणि साहित्याचीदेखील खेळाडू व प्रशिक्षकांना माहिती नाही. राज्यात एकाच खेळाच्या दोन दोन समांतर संघटना निर्माण झाल्यामुळे शासनाला कोणती संघटना अधिकृत, याचा पेच पडला आहे. एकविध खेळांच्या राज्य संघटनांवर शासनाचे कोणतेच नियंत्रण नाही, त्यामुळेच हा प्रश्न उद्भवला असल्याचे मत क्रीडा प्रशिक्षकांनी व्यक्त केले.