शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाचशे कर्मचारी जाणार निवडणुकीला

By admin | Updated: September 21, 2014 00:44 IST

महापालिका ओस : घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता विभागाच्या वसुलीवर परिणाम शक्य

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी महापालिकेच्या दीडशे अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यालयाने नियुक्तीपत्रे दिली आहेत. अजूनही सुमारे साडेतीनशे ते चारशे कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे मिळण्याची चिन्हे आहेत. एक महिना आता हे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त राहणार असल्याने महापालिकेच्या घरपट्टी, पाणीपट्टी व मालमत्ता विभागाच्या वसुलीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा निवडणूक कार्यालयाने निवडणुकीच्या कामी महापालिकेच्या दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी नियुक्ती ठिकाणी अजून हजर झालेले नाहीत, मात्र त्यांना जावे लागणार आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत महापालिकेचे पाचशे ते सहाशे कर्मचारी नियुक्त केले जातात. त्यामुळे यंदाही तितक्याच प्रमाणावर नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे सध्या महापालिकेत पदाधिकारी, सदस्य येत नसल्याने याठिकाणी स्मशानशांतता दिसत होती. त्यातच आता अधिकारी व कर्मचारीही निवडणूक कामाला जाणार असल्याने मुख्यालयासह अन्य कार्यालये, महसुली विभाग शांत होणार आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त झाल्यास महापालिकेच्या करवसुलीवर याचा परिणाम निश्चितपणे होणार आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता विभागांसह अन्य महसुली विभागांची थकबाकी आता ७0 कोटींच्या घरात आहे. येत्या महिन्याभरात वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवणार आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या महापालिकेला कर्मचाऱ्यांची ही कमतरता आणखी अडचणीत ठरणार आहे. (प्रतिनिधी)