Sangli ZP Election Results 2026: सांगली जिल्हा परिषदेत त्रिशंकू, सत्तेसाठी टेकू लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:17 IST2026-02-10T17:16:49+5:302026-02-10T17:17:12+5:30

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सर्वाधिक जागा, भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष

Formation of power in Sangli Zilla Parishad is not possible without an alliance or coalition | Sangli ZP Election Results 2026: सांगली जिल्हा परिषदेत त्रिशंकू, सत्तेसाठी टेकू लागणार

Sangli ZP Election Results 2026: सांगली जिल्हा परिषदेत त्रिशंकू, सत्तेसाठी टेकू लागणार

सांगली : अनेक धक्कादायक निकाल नोंदवित सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले असून, आघाडी किंवा युतीशिवाय सत्ता स्थापना शक्य नाही. पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांना संमिश्र यश मिळाल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसाठी सर्वाधिक ५० उमेदवार भाजपने उभे केले होते. स्पष्ट बहुमतांसह सत्तेचा दाव अनेक पक्षनेत्यांनी केला होता. मात्र, तो फोल ठरल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. अवघ्या २० जागांचा पल्लाही कोणत्याही पक्षाला गाठता आला नाही. १८ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला १६ जागा मिळाल्या आहेत.

काँग्रेसने पलूस तालुक्यात आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व ८ जागा आणि पंचायत समितीच्या सात जागा जिंकल्या आहेत. खानापूर तालुक्यात शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी आपली मजबूत पकड दाखवून देताना विरोधकांना एकही जागा मिळू दिली नाही. जतमध्येही आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषदेच्या नऊपैकी आठ जागा जिंकत विरोधकांना धोबीपछाड दिला.

सत्तेसाठी जिल्हा परिषदेतही महापालिका पॅटर्न निर्माण झाला आहे. युती आणि आघाडी या दोहोंना अगदीच काठावरचे बहुमत आहे. एकूण जागांची संख्या ६१ आहे. बहुमतांसाठी किमान ३१ सदस्यांची आवश्यकता आहे. भाजपने मित्रपक्षांना सोबत घेतले तरी त्यांचे संख्याबळ ३१ पर्यंत जाते. आघाडीतील पक्षांचे एकत्रित संख्याबळ ३० आहे. काठावरच्या बहुमतांमुळे सत्तेसाठी संघर्ष होणार हे स्पष्ट आहे.

गेल्या पंचवार्षिकमध्ये २६ सदस्यांसह बहुमत सहज गाठलेल्या भाजपला यावेळी मात्र झगडावे लागणार आहे. दरम्यान, अनेक दिग्गजांना निवडणुकीत हार पत्करावी लागली आहे. यामध्ये हर्षदा महाडिक, जयश्री पाटील, अनिल आमटवणे आदींचा समावेश आहे. निवडणुकीत मतदारांनी क्रॉस व्होटिंग करत जिल्हा परिषदेला एक आणि पंचायत समितीला दुसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषद गटांचे अंतिम बलाबल असे

  • राष्ट्रवादी (शरद पवार) - १८
  • काँग्रेस - ११
  • भाजप - १६
  • राष्ट्रवादी (अजित पवार) - ६
  • शिंदेसेना - ७
  • उद्धवसेना - १
  • जनसुराज्य - १
  • रयत क्रांती पक्ष १


पंचायत समितीतील तालुकानिहाय बलाबल असे

मिरज : भाजप १०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ३, काँग्रेस ३ व शिंदेसेना २
खानापूर : शिंदेसेना ८
शिराळा : राष्ट्रवादी ६, भाजप २
वाळवा : राष्ट्रवादी (शरद पवार) १४, भाजप युती ८
कडेगाव : काँग्रेस ७, भाजप १
पलूस : काँग्रेस ६, भाजप १,
तासगाव : राष्ट्रवादी (अजित पवार) ८, राष्ट्रवादी (शरद पवार) ३, भाजप १
कवठेमहांकाळ : राष्ट्रवादी (अजित पवार) ३, राष्ट्रवादी (शरद पवार) ५
आटपाडी : भाजप ३, शिंदेसेना ५
जत : भाजप १२, काँग्रेस ४, राष्ट्रवादी (अजित पवार) २

तालुकानिहाय जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार असे

आटपाडी
गट   विजयी उमेदवार -   पक्ष
दिघंची - पृथ्वीराज पाटील - शिंदेसेना
करगणी - विनायक मासाळ - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
निंबवडे - माधवी पडळकर - भाजप
जत
जाडरबोबलाद - सावित्री रवी -  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
उमदी - यलगोंडा तोरणे  - भाजप
संख - कविता पाटील - भाजप
दरीबडची - सरदार पाटील  -  भाजप
मुचंडी - रमेश देवर्षी  - भाजप
बनाळी - सुनील पवार -  भाजप
शेगाव - डॉ. शिवाजी खिलारे - भाजप
डफळापूर - स्वप्नाली मासाळ - भाजप
बिळूर - शिल्पा जीवनावर - भाजप
खानापूर
नागेवाडी - डॉ. शीतल बाबर  -  शिंदेसेना
लेंगरे - मनीषा बागल - शिंदेसेना
करंजे - सई शिंदे -  शिंदेसेना
भाळवणी - हिम्मत जाधव  -शिंदेसेना
तडसर - वैशाली मुळीक -काँग्रेस
कडेगाव
कडेपूर - विद्या कुंभार -  काँग्रेस
वांगी  - प्रियांका महाडिक काँग्रेस
देवराष्ट्रे  - आशा डावरे   काँग्रेस
तासगाव
मांजर्डे  - मोहन पाटील -  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
सावळज  - विजय धेंडे  -राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
विसापूर - अर्जुन पाटील -  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
येळावी - अमित पाटील - काँग्रेस
चिंचणी - अविराज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
मणेराजुरी  - शशिकांत जमदाडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
कवठेमहांकाळ
ढालगाव  - विकास हाक्के राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
कुची - दादासाहेब कोळेकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
देशिंग - सुजाता पाटील -   राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
रांजणी - संजय बनसोडे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
पलूस
कुंडल  - ऋषीकेश लाड  - काँग्रेस
दुधोंडी-  वर्षा जाधव -  काँग्रेस
अंकलखोप - सुदीप गडदे   -काँग्रेस
भिलवडी - प्रतीक पाटील  -काँग्रेस
वाळवा
रेठरे हरणाक्ष - प्रतिमा मोरे  - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
बोरगाव  - कांता वाटेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
कासेगाव - संगीता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
वाटेगाव  -संध्या पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
पेठ   - मंदा माळी   राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
वाळवा  - संताजी मेटकरी शिंदेसेना
कामेरी  - जयराज पाटील  भाजप
चिकुर्डे - अभिजित पाटील  उद्धवसेना
बावची - धैर्यशील थोरात   राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
बागणी - मोहिनी खोत   रयत क्रांती पक्ष
येलूर - देविका राजेघोरपडे  - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
शिराळा
पणुंब्रे तर्फ वारुण  -  शीला मोहिते  - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
वाकुर्डे बुद्रुक -राजेश्वरी नाईक  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
कोकरूड  - साईतेजस्वी देशमुख जनसुराज्य
मांगले  - विराज नाईक  -  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
मिरज
भोसे  -  आशिष जाधव भाजप
एरंडोली  - स्नेहल मोरे    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
आरग - शोभा खोत   भाजप
बेडग  - अस्मिता होनमोरे भ ाजप
मालगाव - दीपाली कांबळे  भाजप
कवलापूर - मंजुश्री कांबळे भाजप
बुधगाव - पूजा एडके काँग्रेस
कसबे डिग्रज - प्रशांत अवधूत  काँग्रेस
कवठेपिरान - मीना पाटील  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
समडोळी - अरविंद तांबवेकर भाजप
म्हैसाळ - वर्षा कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

Web Title : सांगली ज़ेडपी चुनाव 2026: त्रिशंकु परिषद, सत्ता के लिए गठबंधन ज़रूरी

Web Summary : सांगली ज़ेडपी चुनाव में त्रिशंकु परिषद बनी। एनसीपी 18 सीटों के साथ सबसे बड़ी पार्टी बनी, जिसके बाद बीजेपी को 16 सीटें मिलीं। सरकार बनाने के लिए अब गठबंधन महत्वपूर्ण हैं। पलूस में कांग्रेस, खानापुर में शिंदे सेना और जत में बीजेपी का दबदबा।

Web Title : Sangli ZP Election 2026: Hung Council, Alliance Needed for Power

Web Summary : Sangli ZP election resulted in a hung council. NCP emerged as the largest party with 18 seats, followed by BJP with 16. Alliances are now crucial for forming the government. Congress dominates Palus, Shinde Sena in Khanapur, and BJP in Jat.