Sangli Crime: मिरजेत पाच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:48 IST2026-02-11T15:48:25+5:302026-02-11T15:48:25+5:30

खाऊ देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषण

Five year old girl sexually assaulted in Miraj, suspect arrested | Sangli Crime: मिरजेत पाच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक

संग्रहित छाया

मिरज : मिरजेतील पाच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६७ वर्षांच्या वृद्धाला गांधी चौक पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपी विजय ॲन्थोनी कांबळे (वय ६७) याला अटक करून ४८ तासांत गुन्ह्याचा तपास पूर्ण केला आणि सहा दिवसांत, म्हणजेच ९ तारखेला, आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

२ तारखेला पाच वर्षांची अल्पवयीन बालिका घरापासून थोड्याशा अंतरावर असलेल्या किराणा मालाच्या दुकानात खाऊ आणण्यासाठी एकटीच गेली होती. तेव्हा विजय ॲन्थोनी कांबळे याने तिला गल्लीतील रोडकडेला बोलावून गोड बोलून खाऊ देण्याच्या बहाण्याने मिठी मारून तिचे लैंगिक शोषण केले. ४ तारखेला याबाबतीत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर आणि त्यांचे पोलिस पथक यांनी आरोपी विजय ॲन्थोनी कांबळे याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले.

गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर यांनी या अतिशय गंभीर व संवेदनशील गुन्ह्याचा शीघ्र गतीने तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे जमा केले. त्यांनी ४८ तासांत गुन्ह्याचा संपूर्ण तपास पूर्ण केला. आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्यामुळे केवळ सहा दिवसांत म्हणजेच ९ तारखेला, आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीवर शीघ्र गतीने न्यायालयीन कारवाई होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Web Title : सांगली अपराध: मिरज में पांच वर्षीय बालिका से यौन उत्पीड़न, आरोपी गिरफ्तार

Web Summary : मिरज में एक पांच वर्षीय बालिका के साथ यौन उत्पीड़न के आरोप में 67 वर्षीय व्यक्ति को गिरफ्तार किया गया। आरोपी ने मिठाई का लालच देकर बच्ची के साथ दुर्व्यवहार किया। पुलिस ने तेजी से जांच कर छह दिनों के भीतर आरोप पत्र दाखिल कर दिया।

Web Title : Sangli Crime: Minor Girl Sexually Assaulted in Miraj, Accused Arrested

Web Summary : A 67-year-old man was arrested in Miraj for sexually assaulting a five-year-old girl. The accused lured her with sweets before the assault. Police swiftly investigated, filing charges within six days and ensuring the accused faces rapid prosecution.