Sangli News: शेताच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी, पाचजण जखमी; परस्परविरोधी फिर्याद दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:47 IST2026-03-07T15:47:43+5:302026-03-07T15:47:59+5:30

सांगली : दुधगाव (ता. मिरज) येथे शेताच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही कुटुंबातील पाचजण जखमी झाले आहेत. ...

Five people injured in a fight between two families over a farm dispute in Dudhgaon Sangli | Sangli News: शेताच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी, पाचजण जखमी; परस्परविरोधी फिर्याद दाखल

Sangli News: शेताच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी, पाचजण जखमी; परस्परविरोधी फिर्याद दाखल

सांगली : दुधगाव (ता. मिरज) येथे शेताच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही कुटुंबातील पाचजण जखमी झाले आहेत. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे.

फिर्यादी सुशांत कुदळे यांनी संशयित संतोष जनगोंडा पाटील (रा. गवळी गल्ली दुधगाव) आणि सुहास उर्फ निखिल बबन कुरणे (रा. खणभाग, दुधगाव) यांच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे. सुशांत यांच्या घरानजीक असलेल्या शेतात त्यांच्या मामाचा मुलगा संतोष जनगोंडा पाटील (रा. गवळी गल्ली) हा ट्रॅक्टरने पलटी मारण्याचे काम करीत होता. सुशांतची आई शकुंतला यांनी संतोषला, तु आमच्या शेतात ट्रॅक्टर चालवू नकोस असे सांगितले. 

याचा राग आल्याने संतोषने शकुंतला यांच्याशी वाद घालून हात पिरगाळून पाठीत बुक्कीने मारहाण करून ढकलून दिले. आईला वाचविण्यासाठी सुशांत शेतात आले, त्यांनी संतोषला जाब विचारत ट्रॅक्टर बंद करण्यास सांगितले. संतोषने, ‘मला अजून शेत करण्यासाठी पाहिजे, तु शेतात पाय ठेवायचा नाही’ असे म्हणत गळा धरला. सुशांत यांचे वडील तेथे आल्यानंतर संतोषने मित्र सुहास उर्फ निखिल कुरणे यास बोलविले. दोघांनी सुशांत व वडिलांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान संतोष पाटील यांनी संशयित सुशांत महावीर कुदळे, महावीर शामराव कुदळे, शकुंतला महावीर कुदळे (रा. दुधगाव) यांच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे. फिर्यादी संतोष आणि त्यांची आई कल्पना पाटील असे दोघेजण शेती गट क्रमांक १६३६ आणि १६३३ मध्ये ट्रॅक्टरने मशागत करीत होत्या. त्यावेळी शकुंतला कुदळे (रा. गवळी गल्ली) या तेथे आल्या असता फिर्यादी संतोष यांनी त्यांना आपला वाद नंतर मिटवूया असे सांगितले. 

ही बाब त्यांनी घरी जावून सुशांत आणि महावीर कुदळे यांना सांगितली. दोघेही घटनास्थळी येवून, तु माझ्या आईला का बोललास असा जाब संतोष आणि कल्पना यांना विचारून त्यांना शिवीगाळ केली. दोघांनीही संतोष यांना काठीने मारहाण केली. तसेच कल्पना यांना तिघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title : सांगली में भूमि विवाद में लड़ाई, पांच घायल।

Web Summary : सांगली के दूधगाँव में भूमि विवाद दो परिवारों के बीच लड़ाई में बदल गया, जिसमें पाँच लोग घायल हो गए। सांगली ग्रामीण पुलिस स्टेशन में क्रॉस-शिकायतें दर्ज की गई हैं, जिसमें भूमि उपयोग को लेकर हुई झड़प के दौरान एक-दूसरे पर लाठियों से हमला करने और शारीरिक हिंसा करने का आरोप लगाया गया है।

Web Title : Land dispute in Sangli leads to fight; five injured.

Web Summary : A land dispute in Dudhgaon, Sangli, escalated into a brawl between two families, leaving five injured. Cross-complaints have been filed at the Sangli Rural Police Station, accusing each other of assault with sticks and physical violence during the altercation over land use.