शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
6
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
7
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
8
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
9
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
10
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
11
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
12
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
13
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
14
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
15
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
16
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
17
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
18
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
19
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
20
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

By admin | Updated: December 1, 2014 00:05 IST

अवैध साठा केल्याचा आरोप : कारखाना शहराबाहेर हलविण्याची मागणी

विटा : येथील तासगाव रस्त्यावर शनिवारी सकाळी १० वाजता ‘बाबालाल फायर वर्क्स’ या फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटप्रकरणी विटा पोलिसांनी कारखान्याचे मालक मुस्ताकहुसेन अहमद मुल्ला, सादीकहुसेन अहमद मुल्ला, बिलाल मुस्ताकहुसेन मुल्ला, साजिद नजीर शिकलगार व कामगार रियाज गुलाब तांबोळी (सर्व रा. विटा) या पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून अवैधरित्या स्फोटक वस्तू, फटाक्यांचा साठा केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
विटा येथील नेहरूनगर या भरवस्तीत फटाके तयार करत असताना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कारखान्यात अचानक मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात रियाज तांबोळी, बिलाल मुल्ला व साजिद शिकलगार हे तिघेजण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटानंतर तरुणांच्या सतर्कतेने कारखान्यातील सुमारे दोन ते तीन ट्रक फॅन्सी फटाक्यांचा साठा बाहेर काढण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.
येथील बाबालाल फायर वर्क्सचे मालक मुस्ताकहुसेन मुल्ला यांचा कारखाना भरवस्तीत आहे. त्यातच या कारखान्यात शोभेची दारू निर्मिती करण्याचे काम केले जाते. शनिवारीही दारू निर्मिती करतानाच हा स्फोट झाल्याचे घटनास्थळी नागरिकांनी सांगितले. त्यामुळे विटेकर नागरिक आज रविवारी भीतीच्या छायेत वावरत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांनी कारखान्याची पाहणी करून चौकशी केली.
त्यावेळी नागरी वस्तीत स्फोटक वस्तू ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून जादा फटाक्यांचा साठा व निर्मिती केल्याप्रकरणी मुस्ताकहुसेन मुल्ला, सादीकहुसेन मुल्ला, बिलाल मुस्ताकहुसेन मुल्ला यांच्यासह कारखान्यातील कामगार रियाज तांबोळी व साजिद शिकलगार या पाचजणांविरुध्द शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग
विटा येथील फटाका कारखान्यातील स्फोट हा घटनास्थळावरील माहितीनुसार फटाक्यात दारू भरत असतानाच झाला आहे. त्यामुळे विटा पोलिसांनी घटनेनंतर रात्री ११.४५ वाजता पाचजणांवर गुन्हा दाखल केला. नागरी वस्तीत फटाक्यांची निर्मिती करणारा अनधिकृत कारखाना सुरू करणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून फटाक्यांचा जादा अनधिकृत साठा करणे, नागरी वस्तीत नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, हे माहिती असतानाही पत्र्याच्या शेडमध्ये शोभेच्या दारूची निर्मिती करणे तसेच बेकायदेशीर फटाक्यांची निर्मिती व विक्री करणे आदी आरोप मुस्ताकहुसेन मुल्ला, सादीकहुसेन मुल्ला, बिलाल मुल्ला, साजिद शिकलगार व रियाज तांबोळी या पाचजणांवर विटा पोलिसांनी ठेवले आहेत. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.


नागरिकांचा जीव टांगणीला
दरम्यान, या स्फोटानंतर नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. आज रविवारी दुपारी दलित महासंघ कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत बाबालाल फायर वर्क्स या फटाके निर्मितीच्या कारखान्यासह शहरातील अन्य फटाक्यांची दुकाने विटा शहराच्या बाहेर हलविण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. याबाबत प्रदेश उपाध्यक्ष जे. के. कांबळे, अध्यक्ष लखन ठोंबरे, वीरसेन कांबळे व दत्तात्रय कवडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.