शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘हुतात्मा’ची पहिली उचल २२२० रुपये

By admin | Updated: December 20, 2015 00:33 IST

वैभव नायकवडी : राज्यात उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम

वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यातर्फे २०१५-१६ या गळीत हंगामासाठी उच्चांकी २२२० रुपये पहिली उचल जाहीर करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी शनिवारी याबाबतची घोषणा पत्रकार परिषदेत केली. दोन दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. हुतात्माने जाहीर केलेली पहिली उचल राज्यात उच्चांकी असल्याचे मानले जात आहे. नायकवडी म्हणाले की, हुतात्मा कारखान्याचा चालू गळीत हंगाम सुरू करीत असताना, महाराष्ट्राचा आर्थिक कणा असलेला साखर उद्योग प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. साखरेला दर नाही. जागतिक बाजारात साखरेचे दर उतरलेले आहेत. साखर उत्पादन खर्च वाढलेला आहे. अपेक्षित उसाचे गाळप यावर्षी होईल किंवा नाही हा प्रश्न आहे. याचा विचार करता शेतकऱ्यांना परवडेल, असा दर देता येत नाही. तरीसुद्धा क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक धोरणांनुसार शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, ऊसतोडणी, वाहतूक, कंत्राटदार यांच्या हिताच्या दृष्टीने हुतात्मा परंपरेप्रमाणे उसाला उच्चांकी २२२० रुपये पहिली उचल जाहीर करीत आहे. गतवर्षी प्रती टन २६३९ रुपये दर देऊन कारखान्याने देशात प्रथम क्रमांकाचा मान मिळविला होता. हुतात्मा साखर कारखाना केवळ साखर या एकमेव उत्पादनावर १९८४ पासून आजअखेर उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा जपत आहे. या हंगामात कारखान्याने १८ डिसेंबरअखेर दोन लाख सात हजार ३५० टन उसाचे गाळप केले असून, सरासरी साखर उतारा ११.७८ टक्के मिळाला आहे. दोन लाख ४१ हजार ९२५ क्विंटल साखरपोती उत्पादन झाले आहे. हुतात्मा पॅटर्नमुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात प्रगतीसाठी मोलाची भर पडली आहे. आजअखेर शासनाने वेळेत निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे व कारखान्यांचे नुकसान होत आहे. अशावेळी ‘हुतात्मा’ने पुढाकार घेऊन ऊसदराची कोंडी अनेकवेळा फोडली आहे. त्यामागे क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा यांचा विचार ही मोठी शक्ती आहे. कारखान्याने सभासदांना प्रती महिना तीन रुपये दराने १५ किलो साखर, दोन रुपयांनी प्रती मे. टन प्रेसमड बांधपोहोच करून ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. यावेळी उपाध्यक्षा वंदना माने, संचालक शंकर खोत, बाजीराव मोहिते, सुरेश होरे, तुकाराम कदम, पोपट जाधव, शिवाजी पाटील, आनंदा पाटील, बी. टी. घारे, सुनील रकटे, एकनाथ वाघमारे, बाळासाहेब तांदळे, कोंडिबा मस्के, सुरेश कुंभार, सुनीता माळी, कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, चीफ अकौंटंट बी. डी. आव्हाड उपस्थित होते. (वार्ताहर)