fake note: बँकेत बनावट नोटा भरल्या, सांगलीत एकावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:24 IST2025-12-05T16:23:12+5:302025-12-05T16:24:44+5:30

तपासणीत बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले

Fake notes deposited in bank case registered against one in Sangli | fake note: बँकेत बनावट नोटा भरल्या, सांगलीत एकावर गुन्हा दाखल 

संग्रहित छाया

सांगली : येथील सांगली अर्बन बँकेच्या टिंबर एरिया शाखेत पाचशे रुपयांच्या एकोणीस बनावट नोटांचा भरणा केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी राशद जावेद मुल्ला (वय ४९, रा. अभिनव शाळेजवळ, शामरावनगर, सांगली) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत रोखपाल विश्वास आत्माराम पाटील (रा. हरूगडे प्लॉट, सांगलीवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी ११:३० च्या सुमारास बँकेच्या टिंबर एरिया शाखेत खातेदार राशद मुल्ला यांनी पाचशे रुपयांच्या एकोणीस नोटांचा भरणा केला होता. मात्र, सदर नोटा बनावट असल्याचे तपासणीत बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. बुधवारी रात्री याबाबत पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुल्ला याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title : नकली नोट जमा: सांगली में एक व्यक्ति पर मामला दर्ज

Web Summary : सांगली में एक व्यक्ति ने सांगली अर्बन बैंक में उन्नीस नकली ₹500 के नोट जमा किए। सत्यापन के दौरान नकली नोटों का पता चलने पर पुलिस ने राशिद मुल्ला के खिलाफ मामला दर्ज किया। घटना 19 नवंबर, 2025 को हुई।

Web Title : Fake Notes Deposited: Case Filed Against Sangli Man

Web Summary : A man in Sangli deposited nineteen fake ₹500 notes at Sangli Urban Bank. Police filed a case against Rashid Mulla after the counterfeit notes were discovered during verification. The incident occurred on November 19, 2025.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.