शिराळा : शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या प्रभाग ४ मधील नगरसेवक पदासाठीची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित करण्यात आली आहे. याठिकाणी छाननीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाबाबत दावा दाखल करण्यात आला होता. याबाबत ईश्वरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात दि. २४ नोव्हेंबर रोजी दावा फेटाळण्यात आला होता.याबाबत माहिती अशी की, या प्रभागातील प्रदीप यादव व अभिजीत शिवाजीराव यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यातील अभिजीत यादव यांना पक्षाची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, निवडणूक आयोगाच्या नवीन निर्णयामुळे त्यांना पक्षाचे चिन्ह मिळाले नाही. त्यांनी छाननीवेळी आक्षेप घेतला होता, तसेच त्यामुळे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा सत्र न्यायालयात याबाबत तक्रार दाखल केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात दि. २४ नोव्हेंबर रोजी दावा फेटाळण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार ज्या अपिलाचा निर्णय दि.२२ नोव्हेंबरनंतर देण्यात आलेला आहे. त्या जागेची निवडणूक स्थगित करून सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशानुसार या प्रभागात फक्त नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी नव्याने मतदान यंत्रांचे सरमिसळ करावे लागणार आहे.
Web Summary : The election for Ward 4 in Shirala Nagar Panchayat has been cancelled following a dispute over the Nationalist Congress Party symbol. A court appeal was dismissed, but the state election commission ordered a new election schedule, impacting only the councilor position. Only the mayoral election proceeds as scheduled.
Web Summary : सांगली के शिराला नगर पंचायत के वार्ड 4 का चुनाव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रतीक विवाद के बाद रद्द कर दिया गया। अदालत में अपील खारिज हो गई, लेकिन राज्य चुनाव आयोग ने एक नया चुनाव कार्यक्रम का आदेश दिया, जिसका असर केवल पार्षद पद पर पड़ेगा। महापौर का चुनाव निर्धारित कार्यक्रम के अनुसार होगा।