सांगली महापालिकेची निवडणूक १९ जुलैला शक्य : ५ जूननंतर आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:07 PM2018-05-18T22:07:53+5:302018-05-18T22:07:53+5:30

 Election of Sangli municipal elections can be done on July 19: After 5th June, the Code of Conduct | सांगली महापालिकेची निवडणूक १९ जुलैला शक्य : ५ जूननंतर आचारसंहिता

सांगली महापालिकेची निवडणूक १९ जुलैला शक्य : ५ जूननंतर आचारसंहिता

Next
ठळक मुद्देमतदारयाद्यांचे विभाजन पूर्ण

सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ किंवा २० जुलै रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यावरील हरकतींची सुनावणी होऊन ५ जूननंतर आचारसंहिता लागू होईल. आचारसंहिता ते मतदान हा कालावधी ४५ दिवसांचा गृहित धरल्यास जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मतदानाची शक्यता वाढली आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर मोर्चेबांधणीला वेग आला होता. महापालिका प्रशासनानेही प्रभागनिहाय मतदारयाद्या विभाजनाचे काम पूर्ण केले आहे. १ जानेवारी ते ११ मे २०१८ पर्यंत नव्याने मतदार नोंदणी झालेल्यांची नावे या निवडणुकीच्या याद्यांत समाविष्ट केली जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून वाढीव मतदारांची यादीही मागविण्यात आली आहे, असे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

महापालिका प्रशासनाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. एकूण २० प्रभागातून ७८ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मतदार याद्यांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाणार आहे. नवीन मतदारांची अंंतिम यादी २१ मेपर्यंत महापालिकेच्या हाती येईल, असा अंदाज आहे. त्यानंतर मतदार याद्यांवर हरकतीसाठी दहा दिवसांचा कालावधी दिला जाईल. दाखल हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल.

मतदार यादी अंतिम झाल्यानंतर निवडणूक आयोग केव्हाही निवडणुकीची घोषणा करू शकते. मतदानापूर्वी ४५ दिवस आधी आचारसंहिता लागू करण्याचे बंधन आहे. हा कालावधी पाहता, साधारणपणे १९ जुलै रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता ५ जूनच्या दरम्यान लागू होऊ शकते. गत पंचवार्षिक निवडणूक ७ जुलै रोजी झाली होती. त्यामुळे यंदा जुलैच्या दुसºया आठवड्यात मतदान होण्याची शक्यता अधिक आहे.

व्हीव्हीपॅट नाहीच
महापालिकेच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्रासोबतच व्हीव्हीपॅट यंत्रही जोडण्याची मागणी राजकीय पक्षांनी केली आहे. पण यंदाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्र वापरले जाणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महापालिका प्रशासनही व्हीव्हीपॅटबाबत फारसे उत्सुक नाही. ईव्हीएमबाबत काँग्रेससह राजकीय पक्ष साशंकता व्यक्त करीत असून मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणीही आयोगाकडे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. पण त्याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे.

तीन प्रभागांसाठी एक अधिकारी
निवडणूक आयोगाच्या निकषानुसार मतदान केंद्रे तपासणी, त्यानुसार त्या-त्या मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी नियुक्तीचीही प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून महसूल विभागाच्या तहसीलदार, उपजिल्हाधिकारी अशा अधिकाºयांची नियुक्ती केली जाते. तीन प्रभागांसाठी एक निवडणूक अधिकारी असेल. गरज भासल्यास चारसाठी एक अधिकारी नियुक्त केला जाईल. महापालिका प्रशासनाकडून सात निवडणूक अधिकाºयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली जाणार आहेत. त्याशिवाय आचारसंहिता कक्ष व निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रणासाठी एक, असे दोन उपजिल्हाधिकारीही नियुक्त केले जाणार आहेत. अशा अधिकाºयांची यादी येताच विभागीय आयुक्तांकडे त्यांचा प्रस्ताव पाठवून नियुक्तीवर शिक्कामोर्तब होईल, असे खेबूडकर म्हणाले.

ट्रू व्होटरचे सोमवारी प्रशिक्षण
निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर हे अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपवर मतदार यादीचे विभाजन, मतदान केंद्र, उमेदवारांचा निवडणूक खर्च, उमेदवाराचे शपथपत्र, मतदानाची आकडेवारी यासह निकालापर्यंतची माहिती उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅपचे महापालिका अधिकारी व कर्मचारी तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सोमवारी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाचे उपायुक्त अ. तु. सणस, अवर सचिव नि. ज. वागळे, कक्ष अधिकारी अ. गो. जाधव व अभिनव आयटी सोल्युशनचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे उपायुक्त सुनील पवार यांनी सांगितले.

निवडणूक दृष्टिक्षेप...
महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक
२० प्रभागातून ७८ नगरसेवकांची निवड
प्रभाग रचना व आरक्षण प्रसिद्ध
५ जूननंतर आचारसंहिता
१९ जुलैला मतदान शक्य
विद्यमान नगरसेवकांची १३ आॅगस्टपर्यंत मुदत

 

 

Web Title:  Election of Sangli municipal elections can be done on July 19: After 5th June, the Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.