शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आठजणांची जामिनासाठी धाव

By admin | Updated: December 20, 2015 00:35 IST

आरोग्यसेविका पेपरफुटी प्रकरण : ३ जानेवारीला होणार सुनावणी

सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका पेपर फुटीप्रकरणी आठजणांनी शनिवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. त्यावर येत्या ३ जानेवारीला सुनावणी होणार आहे. यापूर्वीही संजय कांबळे याने जामिनासाठी धाव घेतली आहे. किरण वसंतराव कदम (वय ४५, रा. शाहूनगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ), इंदुताई बाबूराव पांढरे (३६, सावळी, ता. मिरज), शीतल कल्लाप्पा मुगूलखोडे (४८, मालगाव, ता. मिरज), ज्योत्स्ना प्रकाश भुरुटे (३१, शेगाव, ता. जत), मंदार मोहन कोरे (२७, हरिपूर, ता. मिरज), शुभांगी प्रकाश पाटील (३२, करोली-एम, ता. मिरज), सुकेशिनी प्रकाश थोरात (३०, सोनी, ता. मिरज) व अलका दिलीप माने (४६, भोसे, ता. मिरज) अशी जामिनासाठी धाव घेतलेल्यांची नावे आहेत. या आठ जणांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात व्यवसाय नोकरी असा उल्लेख केला आहे. पण हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत, का परीक्षेला बसलेले उमेदवार, याची माहिती मिळू शकली नाही. गेल्या महिन्यात पेपरफुटीचे हे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेविका शाहीन जमादार व शाकीरा उमराणी या दोघींना अटक केली होती. न्यायालयाकडून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. तेव्हापासून पोलिसांनी एकाही संशयितास नव्याने अटक केली नाही. त्यावेळी तिसरा संशयित म्हणून संजय कांबळे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. पण पोलिसांनी प्रसारमाध्यमांपासून ही माहिती लपविली होती. त्यामुळे कांबळेने अटकेची कारवाई टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्याला तात्पुरता जामीन मंजूर झाला होता. त्यावर आता २८ डिसेंबरला अंतिम सुनावणी होणार आहे. पोलिसांकडून तपासात दिरंगाई होत असल्याची चर्चा सुरु आहे. तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे (एलसीबी) सोपविला होता. पण लगेच काढूनही घेण्यात आला होता. याचीही आता उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे. (प्रतिनिधी)