शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव पूर्व भाग दुष्काळाच्या वणव्यात

By admin | Updated: September 2, 2015 23:38 IST

खरीप हंगाम वाया : तालुक्यात पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

संजयकुमार चव्हाण - मांजर्डे  तासगाव तालुक्याचा पूर्व भाग मांजर्डे, आरवडे, पुणदी, पेड, वायफळे, बलगवडे, सावळज हा भाग कायम दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. कायम दुष्काळाच्या वणव्यात होरपळणारा हा तालुक्याचा भाग यावर्षीही पुन्हा दुष्काळाच्या छायेत आहे. शेतीबरोबरच पाण्याचा प्रश्नही आता गंभीर बनत चालला आहे. या भागातील विसापूर, पुणदी उपसा सिंचन योजनेसह असणाऱ्या अन्य योजनाही पाच महिने बंद आहेत. तालुक्याच्या या भागात असणाऱ्या तलावांचा पाणीसाठा जवळजवळ मृत होण्याच्या मार्गावर आहे. निळे, बलगवडे या तलावातील पाणीसाठा तसा अपुराच आहे. त्यात पुणदी, पेड, मोराळे या तलावातील पाणीसाठाही पंधरा ते वीस दिवस पुरेल इतकाच आहे, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला आहे. मान्सूनच्या पावसाने यावेळी वेळेत हजेरी लावल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी पूर्ण अंशाने केली. परंतु पेरणीनंतर मात्र पावसाने पूर्ण दडी मारली. पावसाच्या या दडीने शेतकऱ्यांची पिके आता वाळून गेली आहेत. उगवून आलेली कोवळी पिके अक्षरश: करपून गेली आहेत. पावसाच्या या हुलकावणीमुळे परिसरातील शेतकरी दुष्काळाच्या मोठ्या संकटात सापडला आहे. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना आता पाण्याची नितांत गरज आहे. खरीपातील सर्व पिके पाण्याअभावी करपून गेल्याने हा हंगामही वाया गेला आहे. त्यातच परिसरात पिण्याच्या पाण्याच्या समस्येनेही तोंड वर काढले आहे. २00१ पासून आजपर्यंत तीन ते चार वेळा या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. सद्यपरिस्थितीत भागातील द्राक्ष, ऊसशेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मागील काही वर्षापासून अशा पडणाऱ्या दुष्काळामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बळिराजा अक्षरश: पिचून गेला आहे. सध्या खरीप हंगाम वाया गेला आहेच, पण यापुढे पुरेसा पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची समस्याही मोठी असणार आहे.या भागातील पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरु कराव्यात, पुणदी, विसापूर उपसा सिंचन योजना सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. दुष्काळ निवारण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पाणी योजना सुरु करून या भागातील तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.