शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

जातपंचायतीच्या बहिष्कारामुळे मिरजेत आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: September 17, 2015 00:51 IST

तरुणाचे विषप्राशन : सहा महिन्यांत तिसरा प्रकार

मिरज : मिरजेत पोलिसांत तक्रार केल्याबद्दल जातपंचायतीने वाळीत टाकल्याने नितीन नामदेव मोरे (वय ३०, रा. मंगळवार पेठ) या तरुणाने बुधवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नितीन मोरे यास उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वी राजेंद्र गायकवाड या तरुणाने नात्यातील तरुणीशी दुसरा विवाह केल्याने कुंकूवाले समाजाच्या जातपंचायतीने आक्षेप घेऊन राजेंद्र यास घटस्फोट घेण्यास भाग पाडले. याप्रकरणी घटस्फोटित तरुणीचे वडील नामदेव मोरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे जातपंचायतीविरोधात तक्रार केली होती. पोलिसांत तक्रार केल्यामुळे तरुणीच्या भावास मारहाण करून दोन्ही कुटुंबियांना वाळीत टाकण्यात आले. यामुळे राजेंद्रचा मोठा भाऊ लक्ष्मण गायकवाड याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. लक्ष्मणच्या मृत्यूनंतर जातपंचायतीच्या भीतीने घटस्फोटित तरुणीनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी याप्रकरणी सुरेश चंदनवाले, किरण गायकवाड, व्यंकटेश भोसले, अण्णाप्पा चंदनवाले, पोपट मोरे यांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांनी कुंकूवाले समाजात जातपंचायत अस्तित्वातच नसल्याचा पवित्रा घेऊन कुटुंबाला वाळीत टाकल्याचे नाकारले. दरम्यान, संबंधित कुटुंबाने पोलिसातील तक्रार मागे घ्यावी, यासाठी दबाव आणून मुलीच्या दुसऱ्या विवाहास परवानगी देण्याचे आश्वासन देऊन प्रकरण मिटविण्यात आले होते. मोरे यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. जातपंचायतीमुळे सहा महिन्यांत दोन्ही कुटुंबातील तिघांनी विष प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर) मुलीच्या दुसऱ्या विवाहास परवानगी नाकारली जातपंचायतीने पुन्हा मोरे कुटुंबियांना मुलीच्या दुसऱ्या विवाहास परवानगी देण्यास नकार देऊन पोलिसात गेल्याबद्दल समाजाची माफी मागण्यास भाग पाडले. यामुळे या तरुणीचा भाऊ नितीन नामदेव मोरे याने बुधवारी सकाळी घरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार आहे.