Sangli: चारच महिन्यांपूर्वी लग्न अन् काळाचा घाला; ट्रॅक्टर उलटून तरुण ठार.. मदतीसाठी गेलेल्या रूग्णवाहिकेचाही अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 19:04 IST2025-12-06T19:03:28+5:302025-12-06T19:04:35+5:30

दिघंची : वळण घेताना अंदाज न आल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना दिघंची (ता. आटपाडी) येथील ...

Driver dies on the spot after tractor overturns due to misjudgment while taking a turn at Dighanchi in Sangli | Sangli: चारच महिन्यांपूर्वी लग्न अन् काळाचा घाला; ट्रॅक्टर उलटून तरुण ठार.. मदतीसाठी गेलेल्या रूग्णवाहिकेचाही अपघात

Sangli: चारच महिन्यांपूर्वी लग्न अन् काळाचा घाला; ट्रॅक्टर उलटून तरुण ठार.. मदतीसाठी गेलेल्या रूग्णवाहिकेचाही अपघात

दिघंची : वळण घेताना अंदाज न आल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना दिघंची (ता. आटपाडी) येथील ढोले मळा-मोरे मळा कॅनॉल फाट्याजवळ घडली. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राजेवाडी येथील गणेश बनपट्टे (वय २३) असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.

या अपघातातील जखमीला आणण्यासाठी गेलेल्या रूग्णवाहिकेचा देखील त्याच ठिकाणी वळणाचा अंदाज न आल्याने कॅनॉलमध्ये पडल्याने अपघात झाला. यामध्ये सागर घोडके हे रूग्णवाहिकेचे चालक गंभीर जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी, बुधवार दि. ३ डिसेंबर रोजी दुपारी राजेवाडी मधील युवक गणेश बनपट्टे हा ट्रॅक्टर घेऊन ढोले मळा येथे येत असताना ढोले मळ्याजवळ असणाऱ्या कॅनॉल जवळ ट्रॅक्टर पलटी झाला. यावेळी ट्रॅक्टरच्या खाली गणेश बनपट्टे हा चालक सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात झाल्याचे समजताच दिघंची मधील रूग्णवाहिका बोलवण्यात आली. यावेळी अपघातस्थळी वळणाचा अंदाज न आल्याने रूग्णवाहिका कॅनॉलमध्ये पडून अपघातग्रस्त झाली. यामध्ये सागर घोडके हे चालक गंभीर जखमी झाले.

चारच महिन्यांपूर्वी लग्न अन् काळाचा घाला

राजेवाडी येथील मयत गणेश बनपट्टे या युवकाचे चारच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. गणेश बनपट्टे यांचा मृत्यू झाल्याने राजेवाडी गावावर शोककळा पसरली तर त्याच ठिकाणी रूग्णवाहिकेचा देखील दुर्दैवी अपघात झाल्याने सागर घोडके हा युवक गंभीर जखमी झाल्याने लोकांनी हळहळ व्यक्त केली.

Web Title : सांगली: ट्रैक्टर पलटने से नवविवाहित की मौत; मदद के लिए पहुंची एम्बुलेंस भी दुर्घटनाग्रस्त

Web Summary : दिघंची के पास ट्रैक्टर पलटने से 23 वर्षीय गणेश बनपट्टे की मौत हो गई, जिनकी शादी को सिर्फ चार महीने हुए थे। घटनास्थल पर पहुंची एम्बुलेंस भी दुर्घटनाग्रस्त हो गई, जिससे चालक सागर घोडके गंभीर रूप से घायल हो गए। एक ही जगह पर दोहरी त्रासदी।

Web Title : Sangli: Tractor Accident Kills Newlywed; Ambulance Responding Crashes

Web Summary : A tractor accident near Dighanchi killed 23-year-old Ganesh Banpatte, just four months after his wedding. An ambulance responding to the scene also crashed, seriously injuring the driver, Sagar Ghodke. Tragedy struck twice at the same location.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.