शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

नियोजित शिवभोजन केंद्राची डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:09 PM

सांगली जिल्ह्यामध्ये शिवभोजनालय सुरू करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पहाणी केली.

ठळक मुद्देनियोजित शिवभोजन केंद्राची जिल्हाधिकारी चौधरी यांनी केली पहाणीपहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी एक भोजनालय

सांगली :सांगली जिल्ह्यामध्ये शिवभोजनालय सुरू करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पहाणी केली.

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. 

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे उपस्थित होत्या. यामध्ये सांगली बस्थ स्थानक परिसर, मार्केट यार्ड आणि सिव्हील हॉस्पीटल परिसर यांचा समावेश आहे.शिवभोजन केंद्रांची सुरूवात 26 जानेवारी रोजी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार असून ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहाणार आहेत. या भोजनालयांमध्ये बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल.

शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे तेथील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात सक्त मनाई असेल. कोणत्याही परिस्थितीत शिळे अथवा खराब झालेले अन्न ग्राहकांना पुरविण्यात येणार नाही याची जबाबदारी संबंधित संस्था चालकाने घ्यावयाची आहे.

सदर थाळीची किंमत शहरी भागात 50 रूपये राहाणार असून ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रूपये एवढ्या रक्कमेव्यतिरीक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून संबंधितांना शासनामार्फत वितरीत करण्यात येणार आहे. शिवभोजनालयातील लाभार्थी नोंदविण्यासाठी शासनाकडून दिलेल्या ॲपचा वापर करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली