शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या; जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अधिवेशनात ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 13:36 IST

जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अधिवेशन सहा ठराव, महिलांचे चारित्र्यहनन करणाऱ्या टीव्ही मालिका ताबडतोब बंद कराव्यात

सांगली : ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, महिलांचे चारित्र्यहनन करणाऱ्या आणि कुटुंबातील वातावरण बिघडविणाऱ्या टीव्ही मालिका ताबडतोब बंद कराव्यात, असे सहा प्रमुख ठराव जिजाऊ ब्रिगेडच्या ७व्या राज्य अधिवेशनात मंजूर करण्यात आले.

हरीपूर (ता. मिरज) येथे जिजाऊ ब्रिगेडच्या ७व्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वंशज आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अश्विनीताई घोरपडे यांच्या हस्ते झाले. या वेळी स्वप्नाली विश्वजित कदम, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय घोगरे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शैलजा पाटील, विजया पृथ्वीराज पाटील, हरीपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर, प्रियांकादेवी घोरपडे, डॉ. संजय पाटील यांची उपस्थिती होती.

या अधिवेशनातील ठराव

  • ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा.
  • पाचाड येथे जिजाऊंचे भव्य स्मारक व ऐतिहासिक घटनांच्या कलादालनासाठी शासनाने ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी.
  • महिलांसाठी प्रत्येक तालुक्यात मोफत कायदेविषयक सल्ला व उद्योग मार्गदर्शन केंद्र सुरू करावे.
  • विधवांची आभूषणे न काढता योग्य सन्मानासाठी शासनाने निर्णय घ्यावा. प्रत्येक गावात कार्यवाहीसाठी ग्रामपंचायतींना निर्देश द्यावेत.
  • प्रत्येक जिल्ह्यात १०० कोटी रुपयांचे राष्ट्रमाता जिजाऊ सभागृह उभारावे.
  • महिलांचे चारित्र्यहनन करणाऱ्या आणि कुटुंबातील वातावरण बिघडविणाऱ्या टीव्ही मालिका ताबडतोब बंद कराव्यात.

मालिका पाहून कुटुंबात बिघाड नकोडॉ. अश्विनी घोरपडे म्हणाल्या, टीव्हीवरील मालिकांमध्ये कौटुंबिक कारस्थानांचा भडिमार केला जातो. भारतीय कुटुंबांमध्ये फक्त कारस्थानेच चालतात का, असा प्रश्न पडतो. टीव्हीवरील मालिका पाहून कुटुंबात बिघाड होऊ नये. जिजाऊंच्या काळात टीव्ही नसतानाही त्यांनी स्वराज्याच्या उभारणीत प्रभावी भूमिका बजावली.

वाढदिवसाला केक कशासाठी?डॉ. घोरपडे म्हणाल्या, वाढदिवसाला केक कापणे, मेणबत्त्या लावणे, रिटर्न गिफ्टची अपेक्षा करणे ही आपली संस्कृती नाही. इंग्रज साहेबाची संस्कृती त्याच्याबरोबरच गेली. आता आपली संस्कृती टिकवली पाहिजे.

टॅग्स :Sangliसांगली