शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अग्रणी पुनरुज्जीवनात राजकारण नका

By admin | Updated: June 15, 2015 00:19 IST

राजेंद्रसिंह राणा : नदीपात्रातील जलसंवर्धनाच्या कामांची पाहणीे

खानापूर : अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी सर्वांच्या सहकार्याबरोबरच राजकारणविरहीत सहभागाची गरज आहे. शासनाबरोबर प्रत्येक माणसाने ठरवले तर अग्रणी नदी बारमाही होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी केले. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत अग्रणी पुनरुज्जीवनच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सौ. अंजली मरोड, उपसभापती सुहास बाबर, जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, बलवडी (खा.) येथील एका बंधाऱ्याची प्रेरणा घेऊन राज्यात २४००० बंधारे उभा करण्याचे शासनाने प्रयत्न चालू आहेत. त्यापैकी ५००० बंधाऱ्यांचे काम सुरू आहे. आमदार अनिल बाबर यांनी अग्रणी नदी पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे सुरक्षित हातात काम दिल्यामुळे हे काम प्रभावीपणे होणार आहे. तसेच पक्षविरहीत सहभागातून जनतेचे कल्याण होणार आहे. बिनपैशाचीसुध्दा मोठी कामे होऊ शकतात, हे या भागातील लोकांनी दाखवून दिले आहे. यापुढेसुध्दा लोकांच्या बरोबरीने जलबिरादरीचासुध्दा सहभाग राहील, अशी ग्वाही राजेंद्रसिंह राणा यांनी दिली. आमदार अनिल बाबर म्हणाले, आम्ही सर्वांना सोबत घेऊन ही अग्रणी नदी पुनरुज्जीवित करणार आहोत. जिथे गरज असेल, तेथे बंधारे उभे करण्यास मदत करू. या प्रकल्पात राजकीय पक्ष व राजकारण बाजूला ठेवून एकत्रपणे काम करू. लोकांच्या सहकार्याबरोबरच प्रशासनाचा पुढाकार असल्यामुळे या प्रकल्पात कोणतीही अडचण येणार नाही. बाहेरून पाणी, आणून अग्रणी बारमाही होईलच, परंतु लोकसहभागातून पाणी उभा राहिल्यास ती शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद महत्त्वाचा ठरेल. पंचायत समिती, खरेदी-विक्री संघ, मार्केट कमिटी हे सुध्दा अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी मदत करणार आहेत. कृषी विभाग व पंचायत समितीने या कामाच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करावेत. कोणतेही काम हे उत्कृष्टच झाले पाहिजे, याबाबत दक्षता घ्यावी, असे आमदार बाबर म्हणाले. पुढे जाऊन प्रशासन कामे करणार आहे. लोकसहभाग आणि शासन यांची सांगड घालून ही कामे करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष मदत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व प्रांताधिकारी सचिन इथापे यांची मिळत आहे. तसेच जलबिरादरीचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी जमदाडे, जि. प. कार्यकारी अभियंता एल. डी. हवेलीकर, तालुका कृषी अधिकारी डुबल, बेणापूर सोसायटीचे अध्यक्ष गणपतराव भोसले, जि. प. सदस्य फिरोज शेख, जलबिरादरीचे डॉ. सुनील जोशी, डॉ. रवींद्र व्होरा, विनोद बोधनकर, संपतराव पवार, नरेंद्र न्युग, देवयानी कुलकर्णी, उपअभियंता डी. डी. कांबळे, पोसेवाडी, बलवडी, ऐनवाडी, गोरेवाडीचे सरपंच राजेंद्र शिंदे, कृष्णदेव शिंदे, बाळासाहेब जाधव, परशराम गायकवाड, सुभाष आप्पा गायकवाड, तसेच तलाठी, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्रसिंह राणा यांनी तामखडी, अडसरवाडी येथील जालिंदरनाथ करी, बलवडी, आपटेमळा, विठ्ठलनगर, बेणापूर, सुलतानगादे, करंजे येथे सुरू असलेल्या अग्रणी नदी पुनरुज्जीवनच्या कामांना भेटी दिल्या. (वार्ताहर) भविष्यात फायदा अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी जे बंधारे बांधण्यात आले, ते महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात मॉडेल म्हणून पुढे आले आहे. लोकसहभागाबरोबरच राजकारणविरहीत चळवळ उभारण्यात आल्याचा मोठा फायदा झाला आहे. अग्रणी पुनरुज्जीवन हे भल्याचे काम आहे. हे काम बचत खात्यासारखे असून, भविष्यात याचा नक्कीच फायदा होणार आहे.