शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्या घटत ती दोनशेच्या आतमध्ये आल्याने दिलासा मिळाला असतानाच, पॉझिटिव्हिटी रेटही चांगलाच घटला आहे. ...

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्या घटत ती दोनशेच्या आतमध्ये आल्याने दिलासा मिळाला असतानाच, पॉझिटिव्हिटी रेटही चांगलाच घटला आहे. जिल्ह्यातील ‘ॲक्टिव्ह’ रुग्णांची संख्याही प्रथमच हजाराच्या आत आल्याने पुन्हा कोरोनापासून बचावाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांवर आल्याने अनेकांकडून मास्कचा वापर कमी झाला आहे. परिणामी कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेले मास्क, सॅनिटायझरची मागणी घटली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दोन हजारांवर गेली होती. राज्याच्या अनेक भागांत सध्या कमी रुग्ण आढळून येत असताना, जिल्ह्यात रोज शंभरावर रुग्ण आढळून येत आहेत तर सरासरी दहा जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे अद्यापही कोरोना संसर्ग कायम असल्याचेच चित्र आहे.

शासनाकडून कोरोनाविषयक निर्बंध हटविल्याने बाजारपेठेतील गर्दी वाढत आहे तर सोशल डिस्टन्सिंगचा वापर नावालाच होत आहे. तरीही शासनाकडून तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असली तरी सध्या तरी पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याची कोणतीही शक्यता वाटत नाही.

जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांवर कायम होता. आता हा कमी होत अवघ्या २ टक्क्यांवर आला आहे. जिल्हा प्रशासनाने आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजनच्या चाचण्यांचे प्रमाण कायम ठेवले असतानाही रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होत आहे.

कमी होत चाललेली रुग्णसंख्या आणि हटविण्यात आलेले निर्बंध यामुळे अनेकांनी आता कोरोना गेलाच या भावनेने मास्कचा वापर बंद केला आहे. जिल्ह्यात अद्यापही रुग्णसंख्या कायम असल्याने कोरोनापासून बचावासासाठी नियमांचे पालन करणे आवश्यकच असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

कोट

जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोना गेला या भावनेने कोणी राहू नये. अद्यापही रुग्ण आढळत असल्याने नियमित मास्कचा वापर करावा, गर्दीत जाताना विशेष खबरदारी घ्यावी.

डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक

कोट

गेल्या महिनाभरापासूनच मास्कची मागणी घटली आहे. यापूर्वी सर्जिकल मास्कला अधिक मागणी होती. आता सॅनिटायझरची थोडीफार मागणी कायम आहे तर मास्कला मात्र मागणी नाही.

किरण माने, औषध दुकानदार