शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जि. प.च्या शाळा खासगी शाळांकडून लक्ष्य

By admin | Updated: September 2, 2015 23:39 IST

मिरज परिसरातील चित्र : पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांची कसरत

संजय माने- टाकळी  मिरज शहरातील खासगी शाळांनी पटसंख्या वाढीसाठी शैक्षणिक सुविधांच्या नावाखाली शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना लक्ष्य केले आहे. परिणामी विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाने वारेमाप मंजुरी दिल्याने सर्वत्र खासगी शाळांचे पेव फुटले आहे. पर्यायाने पटसंख्या वाढीसाठी स्पर्धा सुरू आहे. खासगी शाळांनी या स्पर्धेत टिकण्यासाठी वाहनांसह विविध शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या आहेत. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पटसंख्येसाठी पळवापळवी सुरू केली आहे. मिरज शहरालगत टाकळी, बोलवाड, मल्लेवाडी, बेडग, म्हैसाळ, विजयनगर, वड्डी, ढवळी ही गावे अवघ्या पाच ते आठ किलोमीटरवर आहेत. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांना त्याचा फटका बसत आहे. शैक्षणिक सुविधांचे आमिष दाखवत विद्यार्थ्यांना खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाला पालकही बळी पडू लागले आहेत. पाल्यासाठी भरमसाट शुल्क देऊन शहरातील खासगी शाळेत प्रवेश घेत असल्याने ग्रामीण भागातील खासगी व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पटसंख्येवर परिणाम झाला आहे. दरवर्षी शहरातील खासगी शाळांकडून विद्यार्थी पळविण्याचे प्रयत्न होत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा देण्याबाबत शिक्षकांवर मर्यादा आहेत. दुसरीकडे आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पालकांची शैक्षणिक सोयी-सुविधा असणाऱ्या खासगी शाळांकडे ओढ वाढल्याने त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्येवर होऊ लागला आहे. जिल्हा परिषदेकडून तुटपुंज्या मिळणाऱ्या निधीत व इतर सोयी-सुविधांबाबत खासगी शाळांसोबत स्पर्धा करणे शक्य नाही. ग्रामीण भागातील पालकांच्या शैक्षणिक सुविधांबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. सेमी इंग्रजी व संगणकीय शिक्षणाची जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुविधा नसल्याने पालकांचा खासगी शाळांकडे कल वाढला आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी, ई-लर्निंग यासह शैक्षणिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. अन्यथा या शाळा बेदखल ठरण्याची शक्यता आहे.शिक्षकांची मुले खासगी शाळांत! जिल्हा परिषदेच्या शाळांत कार्यरत असणाऱ्या काही शिक्षकांची मुलेही खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याची तक्रार आहे. याबाबत पालकांनी जाब विचारल्यास शिक्षक निरुत्तर होताना दिसतात.