शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला मिळाले ६८ हजार कोरोना लसीचे डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST

शुक्रवारी दुपारी लसीचा साठा संपल्याने जिल्हाभरातील २२७ केंद्रांवर लसीकरण ठप्प झाले होते. अनेक लाभार्थ्यांना लस न घेताच परतावे लागले. ...

शुक्रवारी दुपारी लसीचा साठा संपल्याने जिल्हाभरातील २२७ केंद्रांवर लसीकरण ठप्प झाले होते. अनेक लाभार्थ्यांना लस न घेताच परतावे लागले. विशेषत: दुसऱ्या डोससाठी आलेल्यांना ती घेता आली नाही. जिल्हा प्रशासनाने शासनाकडे दोन लाख लसींचे डोस मागितले होते, प्रत्यक्षात ६८ हजार डोस मिळाले. शनिवारी पहाटे जिल्हा परिषदेला ते मिळाले. त्यानंतर डोस घेऊन तातडीने गावोगावी गाड्या रवाना झाल्या. आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्रांनी गावागावांत लस आल्याचे निरोप दिले, त्यानंतर लसीकरणासाठी नागरिकांनी धाव घेतली.

प्रत्येक आरोग्य केंद्रात दररोज किती लसीकरण होते याचा अंदाज घेऊन आरोग्य विभागाने लस वितरित केली. सरासरी प्रत्येक केंद्राला दीड हजार डोस दिले. महापालिकेला पाच हजार डोस दिले. खासगी रुग्णालयांत अद्याप काही डोस शिल्लक आहेत. जिल्ह्यात सध्या दररोज सरासरी १५ ते १८ हजार डोस दिले जातात. या हिशेबाने ६८ हजार डोस जास्तीत जास्त मंगळ‌वारपर्यंतच पुरणार आहेत. तत्पूर्वी आणखी काही डोस मिळण्याची आरोग्य विभागाला अपेक्षा आहे.

चौकट

आजही लसीकरण सुरू राहणार

शनिवारी दिवसभरात ग्रामीण भागात १६ हजार ९६ लाभार्थ्यांना लस टोचण्यात आली. निमशहरी भागात ९३२ जणांना, तर महापालिका क्षेत्रात एक हजार ९९६ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. लसीकरणाची गती कायम राखण्यासाठी आज, रविवारीही सर्व शासकीय लसीकरण केंद्रांत लसीकरणाचे काम सुरू राहणार असल्याचे मुख्य लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले.

चौकट

आजवर ३ लाख ३८ हजार डोस मिळाले

जिल्ह्याला आजअखेर ३ लाख ३८ हजार डोस प्राप्त झाले आहेत. पैकी कोव्हिशिल्डचे डोस २ लाख ४७ हजार आहेत. शनिवारअखेर २ लाख ७८ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.