शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर आदर्श बनविण्याचा निर्धार

By admin | Updated: November 17, 2016 23:02 IST

शामराव पाटील : नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा शाश्वत विकासाचा आश्वस्त जाहीरनामा

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत माजी मंत्री जयंत पाटील, अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली ३१ वर्षांच्या सत्ताकाळात शहराचा शाश्वत विकास सत्ताधारी गटाने केला आहे. राज्यातील अनेक पुरस्कार पटकावून नगरपालिकेने नावलौकिक मिळवला आहे. शहराला देशातील आदर्श शहर बनविण्याचा प्रयत्न यापुढेही सुरुच राहील, अशी माहिती प्रा. शामराव पाटील यांनी दिली. इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिध्द करुन ते पत्रकारांशी बोलत होते. प्रा. पाटील म्हणाले, ३१ वर्षांच्या सत्ताकाळात नागरिकांना पायाभूत सुविधा देतानाच विकासाचे अनेक टप्पे पार केले आहेत. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत जनतेने प्रचंड बहुमताने एकहाती सत्ता देऊन आपला विश्वास व्यक्त केला आहे. जयंत पाटील यांच्या १५ वर्षांच्या मंत्रीपदाच्या काळात शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळून विकासाची अनेकविध कामे मार्गी लागली आहेत. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा शहराचा शाश्वत विकास करण्याला आमचे प्राधान्य राहील. विजयभाऊ पाटील म्हणाले, येत्या पाच वर्षात गुंठेवारीतील सर्व रस्ते डांबरीकरण आणि पेव्हिंग ब्लॉकने अद्ययावत करु. मंत्री तलावाचे सुशोभिकरण लवकरच पूर्ण करू. शहराची ६८ कोटी ८७ लाख रुपयांची भुयारी गटार योजना सप्टेंबर १४ मध्ये मंजूर केल्याचे पत्र तत्कालीन केंद्रीय नगरविकासमंत्री कमलनाथ यांनी पाठवले आहे. योजनाच मंजूर नाही, हा विरोधकांचा आरोप तद्दन खोटा आहे. गुंठेवारी नियमितीकरणास उशीर होत असल्याच्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या आरोपाचा समाचार घेताना विजयभाऊ पाटील म्हणाले, सदाभाऊंच्या जागेचे नियमितीकरण दोन दिवसात करुन दिले आहे. त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या बंगला उभारणीसाठी असलेली तांत्रिक अडचणही आम्हीच दूर करुन दिली आहे. बी. ए. पाटील म्हणाले, येत्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीवेळीही शहरातील नागरिकांवर करवाढ लादू देणार नाही. कर अपील समितीसमोर सत्ताधारी गटातर्फे शहरातील नागरिकांची अभ्यासूपणे आणि सक्षमतेने बाजू मांडली जाईल. खुल्या वर्गातील दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबांचे प्रस्ताव तयार करुन त्यांनाही घरकुल योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरु आहे. अ‍ॅड. चिमण डांगे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाची मान्यता मिळालेली भुयारी गटार योजना, २४ बाय ७ पाणी योजना राज्यातील विद्यमान युती शासनाने निधी न दिल्याने रखडल्या आहेत. भविष्यात या योजना पूर्ण करणारच. यावेळी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, अरुणादेवी पाटील, खंडेराव जाधव, शहाजी पाटील, सुरेंद्र पाटील, रोझा किणीकर, संपतराव पाटील, वसंतराव कुंभार, शंकरराव पाटील उपस्थित होते. (वार्ताहर) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा विकास, भुयारी गटार, २४ तास पाणी योजना, सांडपाण्यावर आधारित वीज निर्मिती, घनकचरा, बायोगॅस व वीज निर्मिती, अद्ययावत रस्ते, प्रेरणा अभियान, महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा, शहरात १२ उद्यानांची उभारणी, मागासवर्गीय मुला—मुलींसाठी वसतिगृह यासह इतर मुद्यांचा समावेश आहे.