शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मिरज जंक्शन असूनही तुम्हाला मिळत नाही सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:55 PM

बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांची रेल्वे राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यात बेळगाव-बेंगलोर, बेळगाव-वास्को या नवीन रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. शेडबाळ-अथणी-विजापूर या नवीन रेल्वेमार्गाच्या कामासाठी आर्थिक तरतूद झाली आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष : वर्षभरात एकही नवीन रेल्वेगाडी नाही

-सदानंद औंधे ।मिरज : दरवर्षी रेल्वे अंदाजपत्रकात प्रवासी सुविधांसाठी कोट्यवधींची तरतूद केल्यानंतरही मिरज जंक्शन रेल्वेस्थानकाला प्रवासी सुविधांची प्रतीक्षा आहे. मिरज-पुणे रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वगळता, प्रवासी सुविधांच्या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मिरज जंक्शन स्थानकाचा विकास रखडला आहे. गेल्या वर्षभरात मिरजेतून एकही नवीन एक्स्प्रेस व पॅसेंजर सुरू झालेली नाही.

मिरज रेल्वेस्थानकातून दररोज पॅसेंजर व लांब पल्ल्याच्या ६५ रेल्वे गाड्यांद्वारे दररोज ७० हजार प्रवासी ये-जा करतात. वैद्यकीय व संगीतनगरी असलेल्या मिरजेत दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असतानाही रेल्वेस्थानकात अपुऱ्या सुविधांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. प्रवाशांना दूषित पिण्याचे पाणी, एक वगळता अन्य प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृहांचा अभाव, अवैध खाद्यविक्रेते, भिकारी, व्यसनी, तृतीयपंथीयांचा प्रवाशांना उपद्रव सुरू आहे.

अपघातात जखमी प्रवाशांना नेण्यासाठी रेल्वे स्थानकात रेल्वेची रूग्णवाहिका नसल्याने जखमींना रिक्षातून न्यावे लागते. वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नसल्याने अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. मिरज-बेल्लारी व मिरज-यशवंतपूर या दोन एक्स्प्रेस वगळता मोठ्या शहरांना जोडणाºया अन्य सर्व एक्स्प्रेस गाड्या कोल्हापुरातून सुटतात. स्थानकातील सहा प्लॅटफॉर्मपैकी काही प्लॅटफॉर्म कमी उंचीचे व सदोष असल्याने अपघातात प्रवासी जखमी होतात. प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने आजारी, वृध्द, महिला व लहान मुलांची गैरसोय होते. स्थानकात दोनच प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर बसविण्यात आले आहेत. प्रवाशांचे साहित्य चोरी, लूटमार, रेल्वे तिकिटांचा काळाबाजार याकडे रेल्वे सुरक्षा यंत्रणांचे दुर्लक्ष आहे. स्थानकाच्या स्वच्छतेचा ठेका खासगी ठेकेदाराकडे आहे. मात्र खासगी स्वच्छता कर्मचारी अपुरे असल्याने स्थानकात अस्वच्छता आहे.

तातडीची वैद्यकीय : सुविधा नाहीस्थानकाच्या उत्तरेकडील पादचारी पूल बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. स्थानकाबाहेर दिवे बंद असल्याने रात्रीच्यावेळी प्रवाशांची लूटमार सुरू आहे. स्थानकाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले बॅगेज स्कॅनर यंत्र व काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. रेल्वेस्थानकात डॉक्टर उपलब्ध नसल्याने प्रवाशांना तातडीची वैद्यकीय सुविधा मिळत नाही.

मॉडेल स्थानकात समावेश होऊनही दुर्लक्षरेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुविधांसाठी प्रवासी संघटनांतर्फे पाठपुरावा केला जातो. मात्र, मागण्यांबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौºयाप्रसंगी स्थानकात स्वच्छता, साफसफाई व इतर कामे करण्यात येतात. मात्र इतरवेळी रेल्वे प्रवाशांना गैरसोयींना तोंड द्यावे लागते. काही वर्षापूर्वी रेल्वे अंदाजपत्रकात मॉडेल रेल्वेस्थानकात समावेश करण्यात आलेल्या मिरज स्थानकाचा विकास रखडला आहे.

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे एक्स्प्रेस नाहीबेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांची रेल्वे राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यात बेळगाव-बेंगलोर, बेळगाव-वास्को या नवीन रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. शेडबाळ-अथणी-विजापूर या नवीन रेल्वेमार्गाच्या कामासाठी आर्थिक तरतूद झाली आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी सुविधांपासून वंचित आहेत. गेल्या वर्षभरात मिरजेतून एकही नवीन एक्स्प्रेस व पॅसेंजर सुरू झालेली नाही.

 

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगली