शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाळव्यात दोन गटात तलवारीने हाणामारी<bha>;</bha> सहाजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST

आष्टा/वाळवा : वाळवा येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दाेन्ही गटांकडून तलवार, कोयता, चाकूसारख्या घातक शस्त्रांचा वापर ...

आष्टा/वाळवा : वाळवा येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दाेन्ही गटांकडून तलवार, कोयता, चाकूसारख्या घातक शस्त्रांचा वापर झाल्याने झाल्याने सहाजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अंकुश भगवान अहिर (वय ४७) व नेताजी महादेव फाटक (वय २८, दोघे रा. वाळवा) यांनी आष्टा पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी, दि. १३ रोजी सकाळी साडे नऊ वाजता घडली. जखमींमध्ये नेताजी महादेव फाटक, रणजित महादेव फाटक, शारदा महादेव फाटक, अंकुश भगवान अहिर, अतुल पाेपट अहिर, राेहन अंकुश अहिर यांचा समावेश आहे.

वाळवा येथील अहिरवाडी रस्त्यावर अहिर व फाटक कुटुंबीय शेजारी राहतात. त्यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. या वादातून नेताजी फाटक यांनी शरद अहिर यास मारहाण केली होती. त्याची तक्रार देण्यास शुक्रवार दि. १२ रोजी अंकुश अहिर हे शरद अहीर यांच्यासोबत आष्टा पोलीस ठाण्यात आले होते. अंकुश अहिर हे शरदबरोबर आल्याचा फाटक यांना राग होता. शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता अंकुश व त्याचा भाऊ अतुल हे दुचाकीवरून (क्र. एमएच १० एझेड ४६४१) शेतात निघाले हाेते. यावेळी रणजित फाटक, नेताजी फाटक यांच्यासह त्यांचे वडील महादेव फाटक व अन्य दाेघा अनाेळखींनी त्यांना अडविले. यावेळी दाेन्ही गटांत पुन्हा जाेरदार हाणामारी झाली. तलवारी, चाकूसारखी घातक शस्त्रे घेऊन दाेन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. यामध्ये नेताजी फाटक, रणजित फाटक, शारदा फाटक, अंकुश अहिर, अतुल अहिर, राेहन अहिर हे जखमी झाले. त्यांना तातडीने आष्टा ग्रामीण रुग्णालयात व नंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत अंकुश अहिर व नेताजी फाटक यांनी आष्टा पोलिसांत परस्परविराेधी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रणजित फाटक, नेताजी फाटक, महादेव फाटक या तिघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. आर. सुतार करीत आहेत.