शिराळा शहरात डेंग्यू, हिवतापाचा फैलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:43+5:302021-04-11T04:26:43+5:30

शिराळा : शिराळा शहरात कोरोनाबरोबरच डेंग्यू आणि हिवतापाचाही फैलाव झाला आहे. शासकीय रुग्णालयात कोरोनाव्यतिरिक्त कोणतेही रुग्ण तपासले जात ...

Dengue, malaria spread in Shirala city | शिराळा शहरात डेंग्यू, हिवतापाचा फैलाव

शिराळा शहरात डेंग्यू, हिवतापाचा फैलाव

शिराळा : शिराळा शहरात कोरोनाबरोबरच डेंग्यू आणि हिवतापाचाही फैलाव झाला आहे. शासकीय रुग्णालयात कोरोनाव्यतिरिक्त कोणतेही रुग्ण तपासले जात नाहीत त्यामुळे सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. येथील शासकीय रुग्णालयात इतर रुग्ण तपासण्याची सुविधा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुरुवार पेठ, सोमवार पेठ, वसाहतवाडी तसेच इतर काही भागात डेंग्यू व हिवतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू केले आहे तसेच जुन्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्र व लसीकरण सुरू आहे. त्यामुळे येथे कोरोनाव्यतिरिक्त इतर सर्वच रुग्ण तपासणी बंद करण्यात आली आहे.

डेंग्यू, हिवतापाचे वाढते रुग्ण आणि शासकीय रुग्णालयात उपचार नसल्यामुळे सामान्य नागरिकांना उपचारासाठी परगावी अथवा खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शासकीय रुग्णालयात रुग्ण तपासणी सुरू करावी तसेच ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्वेक्षण करावे, अशी मागणी होत आहे.

कोट

शहरात शुक्रवारपासून औषध फवारणी, पावडर टाकणे आदी सुरू करण्यात आले आहे.

- सुनीता निकम, नगराध्यक्षा

शहरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी या आरोग्य सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती देऊन सहकार्य करावे.

- डॉ. प्रवीण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी

Web Title: Dengue, malaria spread in Shirala city