शाळा सकाळी भरविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:21+5:302021-03-08T04:25:21+5:30

कोकरुड : मार्च महिन्यात उखाडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या शाळा सकाळच्या सत्रात घ्याव्यात, ...

Demand to fill school morning | शाळा सकाळी भरविण्याची मागणी

शाळा सकाळी भरविण्याची मागणी

कोकरुड : मार्च महिन्यात उखाडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या शाळा सकाळच्या सत्रात घ्याव्यात, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार नववीपासून पुढचे वर्ग सुरू आहेत. त्यातच एप्रिल महिन्यात दहावी, बारावीच्या वार्षिक परीक्षा होणार आहे. त्या ऑनलाईन की ऑफलाईन हे अजून निश्चित नाही. यावर्षी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यासमोर परीक्षेचे आव्हान आहे. या सर्वांवर कोरोनाचे संकट असतानाच दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी फेब्रुवारीपासून उन्हाचा तडाखा सुरू झाला आहे. त्यामुळे दहा ते दोन या वेळेऐवजी सकाळी साडेसात ते साडेअकरा या शाळा घ्याव्यात, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

Web Title: Demand to fill school morning