शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:26 IST

फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे अचानक गाव बंद केल्यानंतर व्यवसायिकांनी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांच्याकडे ...

फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे अचानक गाव बंद केल्यानंतर व्यवसायिकांनी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांच्याकडे कैफियत मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबे डिग्रज : सध्या कोरोनाची परिस्थिती भयानक होत आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यावर पर्याय म्हणून शासनाकडून कडक निर्बंध लावत वेगवेगळे पर्याय पुढे येत आहेत. परंतु कसबे डिग्रजसह परिसरातील गावांमध्ये पोलीस व प्रशासन अचानक ‘गाव बंद’ करतात आहे. या पार्श्वभूमीवर जनतेला विश्वासात घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांनी व्यक्त केले आहे.

बुधवार सकाळी कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे पोलीस आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील दुकाने बंद करण्यास सुरुवात झाली. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक दुकाने बंद करत असल्याची बातमी गावात पसरताच लोकांची तारांबळ उडाली. पूर्वसूचना न देता बंद करण्याचा निर्णय झाल्याने भाजीविक्रेते, छोटे-मोठे दुकानदार, पानपट्टी गॅरेज, व्यापाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांच्याकडे धाव घेऊन कैफियत मांडली.

शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत. परंतु आम्हाला पूर्वकल्पना द्यावी, नियमावली आखून द्यावी, अशी मागणी लोकांनी केली आहे. विशाल चौगुले यांनी उपस्थित नागरिकांना सध्या कोरोनामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या होत असलेल्या भयानक परिस्थितीबाबत माहिती दिली. त्याचबरोबर प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत सहकार्य करण्याची गरज असल्याचे उपस्थितांना सांगितले तसेच जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून नेमक्‍या कोणत्या बाबी बंद ठेवण्यात येणार आहेत, याबाबत माहिती घेतली जाईल तसेच ‘अत्यावश्यक सेवे’खाली येणाऱ्या ज्या बाबी असतील त्याबाबतही माहिती घेतली जाईल. त्यामुळे सध्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासन हे सर्वसामान्यांच्या भावनांचा व मागणीचा विचार करून जनतेला विश्वासात घेत लॉकडाऊनबाबत निर्णय घेईल. असे आश्वासन विशाल चौगुले यांनी दिले.