शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सांगली सिव्हिलमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय सुविधा लवकरच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST

सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात २३ कोटी रुपये खर्चून सीटी स्कॅन व एमआरआय यंत्रणा लवकरच सुरू होणार ...

सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात २३ कोटी रुपये खर्चून सीटी स्कॅन व एमआरआय यंत्रणा लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी २३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. खरेदीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून वर्षभरात यंत्रणा कार्यान्वित होतील.

या दोन्ही सुविधांसाठी राजकीय स्तरावर मागण्या होत असल्या तरी प्रशासकीय स्तरावर त्याला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. सीटी स्कॅनसाठी जिल्हा नियोजन मंडळाने आठ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये स्कॅनिंग उपकरणासह संपूर्ण सेट उपलब्ध होणार आहे. त्याच्या खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एमआरआयसाठी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये एमआरआय यंत्र, स्वतंत्र इमारत, यंत्रणा चालविण्यासाठी तंत्रज्ञ आदींचा समावेश आहे. या खर्चाला आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. आता खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. दोहोंच्या उपलब्धतेसाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी शासनाकडे यापूर्वीच पत्रे दिली आहेत.

आरोग्य विभागाची बहुतांश मोठी खरेदी हाफकिन संस्थेच्या माध्यमातून होते. शासन संबंधित रुग्णालयाला पैसे देते, त्यानंतर रुग्णालयाकडून हाफकिनकडे पैसे वर्ग केले जातात. हाफकिन खरेदी करून रुग्णालयाकडे पाठवते, अशी प्रक्रिया आहे. मात्र, हाफकिनची खरेदी प्रक्रिया अत्यंत संथ आहे. २०१६ पासूनचे खरेदीचे अनेक प्रस्ताव अजूनही मार्गी लागलेले नाहीत, त्यामुळे सांगली सिव्हिलची एमआरआय यंत्रणेची खरेदी हाफकिनऐवजी शासनाच्या जीएम पोर्टलवरून खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे तसे झाल्यास येत्या वर्षभरात सिव्हीलमध्ये एमआरआय व सिटी स्कॅनिंग यंत्रणा कार्यान्वित होईल.

चौकट

दोन्ही यंत्रणांना यापूर्वीच मंजुरी

सध्या या दोन्ही तपासण्यांसाठी सांगलीतून रुग्णांना मिरज सिव्हिलमध्ये पाठवावे लागते. बाह्यरुग्णांना चिठ्ठी दिली जाते, तर आंतररुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका व स्वतंत्र कर्मचारी नेमला आहे. सांगली-मिरज-सांगली प्रवासात रुग्णांचे हाल होतात, त्यामुळे सांगलीतच या दोन्ही यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू होते, त्याला यशदेखील आले आहे.