शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेबाजांना सत्ताभ्रष्ट करा

By admin | Updated: October 8, 2014 23:01 IST

स्मृती इराणी : शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ शिराळ्यात सभा

कोकरुड : ज्या आघाडी सरकारच्या काळात बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही, महिला असुरक्षित झाल्या, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, कोटींचे घोटाळे केले, अशा घोटाळेबाज सरकारला सत्तेवरून कायमचे दूर घालविण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले. त्या शिराळा येथे भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या.स्मृती इराणी म्हणाल्या की, केंद्रातील आणि राज्यातील आघाडी सरकारने युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. स्त्री भ्रूणहत्या आणि महिला असुरक्षिततेत महाराष्ट्राने केव्हाच प्रथम क्रमांक पटकावला आहे. आघाडी सरकारचेच हे पाप आहे. राज्यात शेतीला पाणी नाही, शेतीसाठी घेतलेले कर्ज न फेडता आल्याने राज्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. एवढे करूनही या सरकारने शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना खोटे धनादेश देऊन फसवणूकही केली. जिजाऊंच्या महाराष्ट्रात महिलांना मनमोकळेपणाने फिरणे, राहणेही मुश्किल झाले आहे. अजित पवार आणि सुशीलकुमारांसारखे नेते बेताल वक्तव्ये करून चेष्टा करीत आहेत. मात्र ही जनता आघाडी सरकारला कंटाळली आहे.शिवाजीराव नाईक म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीबरोबर विधानसभेची निवडणूकही जनतेने हाती घेतली आहे. देशातील आघाडीचे घोटाळेबाज सरकार घालवले आहे. यापुढील काळात महामार्गावरील उड्डाणपूल, वाकुर्डे बुद्रुक योजना यासारख्या योजना मार्गी लावण्याचे काम हाती घेतले असून, शिराळा नागपंचमीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन जावडेकर, गडकरींनी दिले आहे. खा. संजय पाटील म्हणाले की, नाईक यांची जिद्द, चिकाटी आणि काम करण्याची पध्दत वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी राजकारण व्यवसाय म्हणून न करता समाजसेवा करण्याचेच काम केले आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, जि. प. सदस्य रणधीर नाईक, सुखदेव पाटील, सौ. अ‍ॅड. शुभांगी पाटील, सौ. जयश्री पाटील, कु. प्रियंका माने, प्रकाश पाटील, प्रा. भीमराव गराडे यांची भाषणे झाली.सौ. सोनाली नायकवडी, सौ. कुंदा पाटील, मकरंद देशपांडे, सौ. सुनंदा नाईक, सौ. राजेश्वरी नाईक, सौ. देवयानी नाईक, सौ. वेदांतिका नाईक, विक्रम पाटील, सुभद्रा आटुगडे, विजयमाला पाटील उपस्थित होते. (वार्ताहर) राज्यात महिला असुरक्षित इराणी म्हणाल्या की, महाराष्ट्र सर्व क्षेत्रात प्रगतीवर असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या आघाडी सरकारच्या काळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जिजाऊंचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात महिलांना मनमोकळेपणाने फिरणे, राहणेही मुश्किल झाले आहे. अजित पवार आणि सुशीलकुमारांसारखे नेते बेताल वक्तव्ये करून चेष्टा करीत आहेत. मात्र ही जनता आघाडी सरकारला कंटाळली आहे, अशीही टीका त्यांनी केली.